बुतशिकन जावळी या आगामी मराठी चित्रपटाचे अतिशय अनोखे असे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित

324

पुणे प्रतिनिधी,

बुतशिकन जावळी हा चित्रपट, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या प्रसंगानंतर घडणाऱ्या घटनांचा काल्पनिक विस्तार करतो. ऐतिहासिक प्रसंगावर आधारित काल्पनिक चित्रपट अशी टॅग लाईन असलेले हे मोशन पोस्टर कुतूहल निर्माण करत आहे . या चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक अभिमन्यू डांगे आहेत . या पूर्वी अभिमन्यू डांगे यांना ‘कातळ’ या लघुपटाच्या छायांकनासाठी त्यांना ‘दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे . त्यांनी गॉनकेश (२०१९), हॅंडओवर (२०११) या चित्रपटांचे छायांकन देखील केले आहे. तसेच त्यांनी छायांकन केलेल्या ‘मी वसंतराव’ ह्या चित्रपटाची IIFI २०२१ या प्रख्यात चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. FTII या संस्थेतून छायांकनाचे प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटा बद्दलची इतर सर्व माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.