पुणे वन विभागाकडून अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई

480

पुणे प्रतिनिधी,

 मौजे पिसोळी (अंतुले नगर) वन परिक्षेत्रातील कोंढवा येथील राखीव वनक्षेत्रावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे वन विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे.

मौजे पिसोळी (अंतुले नगर) वन परिक्षेत्रातील कोंढवा येथील राखीव वनक्षेत्र स. नं ३० मधील १.०३ हे. आर. राखीव वनक्षेत्रावर द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या अतिक्रमणावर वनविभागाने कारवाई केली असून अतिक्रमण निष्कासित करण्यात आले आहे. *गोठ्यामधील ९६ गुरांची* रीतसर वैद्यकीय तपासणी करून गुरांना पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे ठेवण्यात आले आहे.

कारवाईला वारंवार अडथळा आणल्या प्रकरणी वेदांग कानडे या तरुणावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. समाज माध्यमावर चुकीची माहिती प्रसिद्ध करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आशुतोष झा व शिवशंकर स्वामी यांच्यावरही सायबर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली आहे. अतिक्रमण धारक द्वारकाधीश गोरक्षा गोशाळा यांच्यावर गुन्हा दाखल असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

कारवाई कायदेशीररीत्या करण्यात आली असून समाज माध्यमाद्वारे कुणीही चुकीची माहिती प्रसारित करू नये तसेच त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये.असे करताना आढळल्यास पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करण्यात येईल असे वनक्षेत्र अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.