कर्जत न्यायालयाकडून तेरा चोरीचे गुन्हे दोन दिवसात निकाली ; चोरीप्रकरणी दोन महिलांना सश्रम कारावास

408

 पोलीस प्रशासनाची बाजू मांडणाऱ्या सरकारी अभियोक्ता यांचा कोकण पोलीस महानिरीक्षकां कडून सत्कार

कर्जत

   कोकणातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील काही महिलांना गंडा घालत दोन महिलांनी सोन्या-चांदीचे दागिने व भांडी पळवली होती सदर प्रकरणी दोन महिलांना कर्जत येथील प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता साबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने १३ चोरीचे गुन्हे दोन दिवसात निकाली काढतात आरोपी दोन महिलांना १ वर्षा चा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे सदर प्रकरणात पोलिसांची बाजू मांडणाऱ्या कोंढवा खुर्द गावचे सुपुत्र सहाय्यक सरकारी अभियोक्ता सध्या कर्जत येथे रुजू असलेले सरकारी अभियोक्ता अमर पंढरीनाथ ननावरे यांचा कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक IG यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

                   सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमर पंढरीनाथ ननावरे यांनी कोकणातील कर्जत फौजदारी न्यायालयात सरकारी अभियोक्ता म्हणून पोलिसांकडून दि.६ डिसेंबर २०२१ रोजी दाखल करण्यात आलेल्या दोषारोप पत्रावर जोरदार युक्तिवाद करत पोलीस तपासातील साक्ष पुराव्यांच्या आधारावर पोलीस प्रशासनाची व शासनाची भक्कम बाजू मांडत तेरा चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना सदर प्रकरणात शिक्षा होण्याकरीता भक्कम योगदान दिले कर्जत येथील शासकीय अभियोक्ता यांच्या युक्तिवादाच्या भरोशावर तसेच पोलीस प्रशासनाच्या तपासावर कर्जत न्यायालयाने जलद गतीने चालविलेल्या या खटल्यात न्यायालयाने सदर खटला एक ते दोन दिवसात निकाली काढत सदर गुन्ह्यातील दोन्ही महिला आरोपींना शिक्षा ठोठावली यामध्ये ७ डिसेंबर रोजी न्यायालयाने आठ प्रकरणांमध्ये तर आठ डिसेंबर रोजी सदर न्यायालयाने पाच प्रकरणांमध्ये सदर गुन्ह्यातील महिला आरोपीतांना प्रत्येकी गुन्ह्यात एक वर्षाचा सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावत खटला निकाली काढला दिनांक ६ डिसेंबर रोजी न्यायालयात दाखल झालेल्या दोषारोप पत्रानुसार दिनांक ८ डिसेंबर रोजी शिक्षा ठोकत काढलेल्या निकाली खटल्यामुळे गुन्हेगारांच्या मनात धडकी भरली असून न्यायालयाच्या या जलद गतीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत यातून समाजात गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी नक्कीच मदत मिळणार आहे सदर प्रकरणात पोलीस तपासा बरोबरच शासनाची भक्कम बाजू मांडणाऱ्या कर्जत न्यायालयातील सरकारी अभियोक्ता अमर पंढरीनाथ ननावरे यांचा कोकण विभाग परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री संजय मोहिते यांचे हस्ते रायगड व जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अशोक दूधे,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे , पोलीस निरीक्षक श्री रमेश तेंडुलकर यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.