व्यापार आणि नव उद्योजकांसाठी “एसबीसी गाला एक्स्पोचे” आयोजन

369

पुणे, दि. ५ जानेवारी – कोरोनाकाळात अनेक व्यावसायिक अडचणी आले असून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी साई बिजनेस क्लबतर्फे भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक आणि इंडस्ट्रीयल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकांच्या मेळाव्याबरोबर सामाजिक आणि व्यावसायिक विस्तार करण्यासाठी भरपूर संधींचा फायदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. २० एप्रिल रोजी मुंबईमधील हॉटेल सहारा स्टारमध्ये हा एक्स्पो होणार आहे.

यावेळी विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. भाजपचे उद्योग विभागाचे महामंत्री जयेश जोशी यांच्यासमवेत अभिनेते, दिग्दर्शक आणि मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले असून ते देखील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.

आयोजक डॉ. कृति वजीर म्हणाल्या की, आगामी काळात हा एक्स्पो भारतातील मोठ्या एक्स्पोपैकी एक गणला जाणार असून यामध्ये उद्योजकांच्या मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टीने विचार करण्यात आला आहे. केवळ व्यावसायिक दृष्टीपेक्षा युवा पिढीमध्ये स्वयंरोजगाराची प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे. साई बिजनेस क्लबच्यावतीने नेहमी सामाजिक आणि व्यावसायिक गोष्टींना प्रोत्साहन देण्यात अग्रेसर राहिले आहे. या क्लबच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरिल संपर्क वाढवून व्यावसाय वृद्धी करण्याचा हेतू आहे. अशा पद्धतीचे कार्यक्रम उद्योजकांना नेहमी प्रोत्साहन देत आले आहेत. कोरोना काळात उद्योजक आणि व्यापार्‍यांमध्ये निराशेचे वातावरण आहे, मात्र आता त्यांच्यासाठी या कार्यक्रमाद्वारे नवी संधी आणि उमेद निर्माण झाली आहे.

साई बिजनेस क्लबच्या संस्थापिका डॉ. कृति वजीर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नव उद्योजक आणि व्यापार्‍यांना त्यांच्या संदर्भातील उत्पादन किंवा सेवा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध प्रकारचे स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुरस्कार नामांकन आणि स्टॉल्स बुकिंसाठी संपर्क – मो.नं.: 8805160100