नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत वेदांत तळेकर याची उत्तुंग भरारी…

355

“मेहनतीचे फळ वेदांच्या पदरी…”

गोव्यातील पणजी येथे झालेल्या ओलंपिक असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे मिशन ओलंपिक नॅशनल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ,२०२१ आयोजित करण्यात आली .या स्पर्धेत इतर राज्यातून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. गुजरात ,राजस्थान ,मध्य प्रदेश, हिमाचल ,महाराष्ट्र ,गोवा, ओडिसा, कर्नाटक अशा अनेक राज्यातून स्पर्धकांनी स्पर्धेला उपस्थिती लावली. राज्यातील सर्वोत्तम स्पर्धक या स्पर्धेत आपल्या खेळाचे उत्तम सादरीकरण करून स्पर्धेला विशेष स्थान प्राप्त करून दिले.स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी गेली अनेक वर्ष सराव करीत स्पर्धा जिंकण्याचा चंग बांधत स्पर्धेत सहभाग नोंदविला असल्याचे स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील वेदांत सदाशिव तळेकर या स्पर्धकाने १२ वर्षे खालील वयोगटातील शॉर्ट रेस, लॉन्ग रेस स्पर्धेत महाराष्ट्राला प्रत्येकी एक असे दोन कास्यपदक मिळवून येण्याचा मान पटकावला. या स्पर्धेकरिता स्पर्धक वेदांत तळेकर यास सातत्याने सराव करून घेणारे रॉक अँड विल स्केटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.

प्रशिक्षक विजय मलजी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या स्पर्धेकरिता वेदांत तळेकर या स्पर्धकाला गेल्या वर्षभरापासून अनेक वैविध्यपूर्ण सरावातून हे यश प्राप्त झाल्याचे सांगितले तसेच या यशामागे वेदांचे कठीण परिश्रम व सातत्यपूर्ण मेहनत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वेदांत तळेकर हा पुण्यातील क्रिसेंट हायस्कूल या शाळेत इयत्ता सातवी मध्ये शिकत असून त्याने यापूर्वी झालेल्या स्पर्धांमध्ये २ सुवर्ण ,२रौप्य ,१० कास्यपदक अशी पदक मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. वेदांत तळेकरच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी तसेच स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाजातील सर्व स्तरातून त्याच्या या कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.