चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे(व्हर्चुअल) आयोजन

287

• ३ दिवसीय व्हर्चुअल आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे ०४ मार्च ते ०६ मार्च २०२२ दरम्यान आयोजन
• या परिषदेत देश-विदेशातील जवळपास३, ५०० हून अधिक डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत .
• या परिषदेमध्ये स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूट, अमेरिकेतील मेयो क्लिनिक आणि व्हर्जिनिया विद्यापीठ, लेस्टर युनिव्हर्सिटी, इम्पीरियल कॉलेज आणि युके येथील न्यूकॅसल युनिव्हर्सिटी आणि जर्मनीतील ड्युसेल्डॉर्फ युनिव्हर्सिटीचे प्रख्यात आंतरराष्ट्रीय वक्ते बोलणारआहेत.
• यावेळी ५० तरुण संशोधकाना चेलाराम फाउंडेशन डायबिटीज रिसर्च अवॉर्ड ने सन्मानित केले जाणार आहे. ३ लाखांचे हे पुरस्कार ४ विभागामध्ये दिले जाणार आहेत. ( पहिल्या बक्षिसाची रक्कम २ लाख रुपये असेल तर दुसऱ्या बक्षिसाची रक्कम एक लाख रुपये असेल )
• चेलारामडायबेटीसइन्स्टिटयूटआणिब्लूसर्कलफाउंडेशनयांच्यासंयुक्त विद्यमाने रविवारी ०६ मार्च २०२२ रोजी ३ किमीच्या व्हर्चुअल मॅरेथॉनचे आयोजन केले आहे.
मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२२ (व्हर्चुअल) चे आयोजन केले आहे. दरवर्षी, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट भारत आणि परदेशात वैद्यकीय व्यावसायिक, संशोधक आणि पॅरा-मेडिको व्यावसायिकांसाठी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन करते. या परिषदेचा उद्देश मधुमेहावर मात करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्य सेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे हा आहे
०४ मार्च ला प्रो. निल्स-गोरन लार्सन, (कॅरोलिंस्का इन्स्टिट्यूट येथील फिजिओलॉजी आणि मेडिसिनसाठी नोबेल पारितोषिक समितीचे अध्यक्ष, कॅरोलिंस्का युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, स्टॉकहोम, स्वीडन येथील वैद्यकीय आणि जैवरसायनशास्त्र आणि जैवभौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख), प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. तर ०६ मार्च रोजी मेयो क्लिनिक हेल्थ सिस्टीम यूएसएच्या अध्यक्ष डॉ. प्रतिभा वर्के, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
या परिषदेमध्ये रूग्णालयात रक्तातील साखरेचे नियंत्रण, मधुमेह व्यक्तींची काळजी, ग्लूकोजचे प्रमाण, डायबेटीस केअरमध्ये काही नवीन संशोधन, डायबेटीस हार्टफेल्युअर, इंसुलिनपंप, बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया, आठवड्यातून एकदा इंजेक्शन्स, डायबेटीस व्यवस्थापनामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची भूमिका, मधुमेहाचे रिमोट मॉनिटरिंग, मधुमेह रुग्णांची काळजी घेणे या गोष्टींवर चर्चा केली जाणार आहे.
यावेळी बोलताना चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे श्री लाल एल. चेलाराम म्हणाले की, “चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट नेहमीच मधुमेह आणि त्यामुळे होणारे विविध विकार टाळण्यासाठी आघाडीवर राहिली आहे. या परिषदेद्वारे मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे मधुमेह व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यावरील उपचारांवर सकारात्मक प्रभाव पडेल.”
ते पुढे म्हणाले की, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट तर्फे या वर्षी दोन नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत – चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट जे नाविन्यपूर्ण मधुमेह संशोधनासाठी निधी देईल आणि ‘क्रॉनिकल ऑफ डायबेटिस रिसर्च अँड प्रॅक्टिस’ नावाचे फ्लॅगशिप जर्नल जे ग्राउंडब्रेकिंग संशोधन समोर आणण्यावर लक्ष केंद्रित करेल.
चेलाराम डायबिटीज संस्थेचे सी.ई.ओ.डॉ. उन्नीकृष्णन एजी,म्हणाले की, “ इंटरनॅशनल डायबिटीज समिटला मिळालेला प्रचंड प्रतिसाद मधुमेह काळजी व्यवस्थापनासाठी व्यावहारिक उपायांची गरज अधोरेखित करतो.दरवर्षी, आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेतील सहभाग वाढत आहे. या परिषदेमध्ये भाग घेणारे डॉक्टर आणि संशोधक हे कोविडमध्ये डायबेटीसची काळजी कशी घ्यावी यावर आपला अनुभव सादर करणार आहेत. पॅंडेमिक डायबेटोलॉजी आणि टेलिहेल्थ यांसारखी सत्रे डॉक्टरांना डिजिटल आरोग्य सेवा प्रदान करण्यास सक्षम करून सकारात्मक बदल घडवून आणतील. टाइप १ आणि २ मधुमेहाच्या व्यवस्थापनावरील व्यावहारिक सत्रे हे सुनिश्चित करतात की या ज्ञानाचे आणि संशोधनाचे फायदे ज्यांना मधुमेह आहे त्यांना मदत होईल.”
यावेळी बोलताना चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.(ब्रि) अनिल पी पंडीत म्हणाले की, चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट हे अत्याधुनिक सोई सुविधांबरोबर ग्लूकोज मॉनिटरिंग सिस्टम, इन्सुलिन पंप, अॅक्सिडेंट इमर्जन्सी ,ऑर्थोपेडिक, न्युरोसर्जरी व नेत्ररोग यासह विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी सज्ज आहे. चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा पुरवत असल्यामुळे मधुमेह आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी हे अग्रगण्य इन्स्टिट्यूट आहे. सहाव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन करण्याचा उद्देश मधुमेह तज्ञ मधुमेहामध्ये कशा प्रकारे काळजी घ्यावी तसेच मधुमेहाच्या धोरणाबद्दल समाजाला माहिती द्यावी असा आहे.
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट ही संस्था इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (IDF) मान्यताप्राप्त सेंटर ऑफ एज्युकेशन आणि सेंटर ऑफ एक्सलन्स इन डायबिटीज केअर आहे. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटने डायबेटिक फूट मॅनेजमेंट या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रचना केली आहे. चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटने गरोदरपणातील मधुमेह मेलिटस व्यवस्थापनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि मधुमेह व्यवस्थापनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची रचना देखील केली आहे. या सर्व अभ्यासक्रमांना लेस्टर डायबिटीज सेंटर, यूके यांनी मान्यता दिली आहे. मधुमेह आणि संबंधित विकार व्यवस्थापनासाठी सर्वांगीण दृष्टीकोन ठेवून चेलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूटने त्याच्या शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग म्हणून नुकताच इनपेशंट ग्लुकोज मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे, ज्यामुळे डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत होईल. चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूट लवकरच डायबेटिसमधील आहाराच्या मूलभूत तत्त्वांवर एक विशेष प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणार आहे ज्यामध्ये मधुमेहातील योग्य पोषणाच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असेल.
सहावी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद- २०२२ ही वैद्यकीय क्षेत्रातील सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान याला जोडणारा एक दुवा ठरू शकेल. तसेच ही परिषद डॉक्टर व संशोधक यांना मधुमेहाच्या नवीन संशोधनांवर प्रकाश टाकण्यासाठी एक वैद्यकीय व्यासपीठ उपलब्ध करून देईल.