तीर्थक्षेत्र आळंदीपासून भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचा दौरा सुरु

565

अर्जुन मेदनकर,आळंदी :

ज्येष्ठसमाज सेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन राळेगण सिद्धी पुणे विभाग विश्वस्त राधेश्याम जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर यांचे सूचनेनुसार न्यासाचे धोरणाप्रमाणे पुणे जिल्हा समिती चा जिल्हा दौरा खेड तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या प्रयत्नातून तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलीच्या संजीवन समाधी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आला. 
  याप्रसंगी प्रथम पुणे जिल्हा समितीचे आळंदी नगरीत स्वागत करण्यात आले. आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी पोलीस स्टेशनचे वतीने प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे, खेड तालुका समितीचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब चौधरी, सचिव सतीश चांभारे, आळंदी शहर अध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी अध्यक्ष किशोर आप्पा कुऱ्हाडे पाटील, माजी उपाध्यक्ष अशोक रंधवे पाटील यांचे हस्ते पुणे विभागाचे विश्वस्त राधेश्‍याम जगताप, जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर, जिल्हा सचिव अजिंक्य जगदाळे यांचेसह जिल्हा समितीचा सत्कार करण्यात आला.   या बैठकीला खेड तालुका समितीचे अध्यक्ष प्रकाश पाचारणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब चौधरी, सचिव सतीश  चांभारे, सहसचिव भरत गुपचूप, आळंदी शहराध्यक्ष अर्जुन मेदनकर, सदस्य अशोक रंधवे, किशोर आप्पा कुऱ्हाडे, गौतम पाटोळे, सिताराम आरुडे, बाजीराव वहिले, किसनराव गोपाळे, डॉ. शरद जोशी, बाळासाहेब पाचारणे, चंद्रकांत गावडे, अनिल शिंदे, सुनिता पोकळे, अनिराज मेदनकर आदी उपस्थित होते. बैठकीत तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांनी घोषित केलेल्या  तालुका कार्यकारणीस मान्यता देणे, सदस्य नोंदणी, संघटना बांधणे, आळंदी नगरपरिषद करिता कार्यकारिणीची निवड करणे, जिल्हा समितीचे कार्यकारिणी साठी सदस्यांची निवड करणे इत्यादी कामकाज करण्यात आले. तसेच या बैठकीत पुणे विभागाचे विश्वस्त राधेश्याम जगताप, जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ टाकळकर, खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे यांनी मार्गदर्शन केले.    पुणे जिल्ह्यातील १४ तालुके व पुणे, पिंपरी चिंचवड शहर यामध्ये जिल्हा समितीचा दौरा होणार असून कामकाजाबाबत बैठका होणार आहेत.  सर्वांचे आभार सहसचिव भरत गुपचूप यांनी मानले.