विरेंद्र म्हात्रे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले’ पुरस्काराने सन्मानित

373

गिरीश भोपी, नवी मुंबई

नेरुळ नोडमधील युवा नेते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष श्री. विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले’ पुरस्कार ने विरेंद्र म्हात्रे यांना गौरविण्यात आले आहे.

देवीचा पाडा पनवेल या ठिकाणी सन्मान सोहळामध्ये युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड, याल तर हासाल यात सनजिवन म्हात्रे यांच्या हस्ते विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावले’ पुरस्कार २०२२’ने सन्मानित करण्यात आले,केवल गायकवाड याच कार्यक्रमात लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई करत असलेल्या उल्लेखनीय जनताहितैषी कार्याचीही दखल युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेकडून घेण्यात आली. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या सामाजिक संघटनेलाही पुरस्काराने गौरविण्यात आले. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.

या कार्यक्रमात सदर कार्यक्रमासाठी गणेश म्हात्रे, नरेश सुरेश गायकवाड, आकाश देशमुख, मनोज कडू, सुरज यादव, ऋषिकेश शिंदे, प्रमोद मंडळ, रवी जाधव, अमोल गायकवाड, नागेश गायकवाड, महेश गायकवाड यांनी व युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.