आळंदीत दत्तनगर क्रिकेट क्लब स्पर्धेस उत्साही प्रतिसाद

363

आळंदी ( अर्जुन मेदनकर) : दत्तनगर क्रिकेट क्लब आयोजित हाप पीच क्रिकेट स्पर्धेस परिसरातून उत्साही प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दत्तनगर क्रिकेट क्लब यांनी मिळविला.
या स्पर्धेतील विजेत्या संघात सिद्धेश भैय्या स्पोर्ट्स क्लबने द्वितीय क्रमांक तर चऱ्होली स्पोर्ट्स क्लब आणि चतुर्थ क्रमांक क्रमांक अमर दादा खेडेकर स्पोर्ट्स फाऊंडेशने मिळविला. पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या प्रसंगी नगरसेवक प्रकाशशेठ कुऱ्हाडे, सागरशेठ बोरुंदीया,सचिनशेठ पाचुंदे, उमेश कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, रोहन कु-हाडे, अनिल कुऱ्हाडे, विनय देवकर, आशिष गोगावले, शंकर येळवंडे, विकास पाचुंदे, शुभम जाधव, प्रशांत भोसले, अक्षय रंधवे, अनिकेत डफळ, सौरभ गव्हाणे, मनोज पवार, आशिष बनसोडे, कृष्णा देशमुख, राज घोडके, गोविंद बनसोडे, अक्षय जाधव, निलेश वाबळे, रोनक जोशी, राहुल पटाईत, चंदन ताजवे, आबा रांजणे आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे , युवा नेते रोहन कु-हाडे यांनी मार्गदर्शन केले.