६४ लाखांच्या चेक बाऊन्स प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर

1008

मुंबई मेट्रोपॉलिटन कोर्टाचा आदेश

प्रतिनिधी (मुंबई) : मुंबई मेट्रोपॉलिटन कोर्ट बॅंन्ड्रा येथील चेक बाऊन्सच्या प्रलंबित प्रकरणामधील आरोपीला न्यायालयाने १५,००० रूपयांच्या बाॅंण्डवर जामीन मंजूर केला आहे. मुंबई मधील भगवान पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कछ, गुजरात येथील ओम ॲरोमॅटिक या कंपनीला ६४ लाखांचा माल विकला होता. परंतु ओम ॲरोमॅटिक या कंपनी ने व तिच्या भागिदारांने चक्क पैसे नसलेल्या खात्याचा धनादेश देऊन ६४ लाखांचा गंडा घातला. या प्रकरणाची सुनावणी मुंबई मेट्रोपॉलिटन कोर्ट बॅंन्ड्रा येथील न्यायालयात झाली. आरोपीच्या वतीने ॲड. सत्यजीत कराळे पाटील यांनी काम पाहिले. तसेच त्यांना ॲड. स्वाती मिश्रा, वंशिका शर्मा, जतिन असरानी व माही खान यांनी सहकार्य केले. सदरील प्रकरणामध्ये इतर आरोपींना अटक वॉरंट जारी केले असून पुढील सुनावणी १० जून रोजी होणार आहे.