विविध मागण्यांसाठी सुरेश कवडे यांच्या नेतृत्वात जनाक्रोश मोर्चा

385

अनिल चौधरी, पुणे

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, खराब रस्ता, अनिमित होणारा पाणीपुरवठा ,अर्धवट असणाऱ्या ड्रेनेजलाइन त्यातून बाहेर पडणारे मैलायुक्त पाणी, कचर्‍याची गंभीर समस्या, अवेळी उचलला जाणारा कचरा त्यातून होणारी दुर्गंधी, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे ,विजेच्या खांबावर असणारे धोकेदायक केबल्स तात्काळ काढणे या सर्व नागरी समस्या घेउन आज गोकुळ नगर चौकातून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने या मोर्चात तरुण ,महिला, ज्येष्ठ नागरिक, यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. कात्रज कोंढवा रोड वरील नागरिकांना सातत्याने पाण्यासाठी भांडावं लागतं, खराब ड्रेनेज लाईन व त्यातून रस्त्यावर येणारे मैलायुक्त पाणी, यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं हे आमचं दुर्दैव म्हणावे लागेल. वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा , गेल्या एक वर्षापासून पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज चे पाणी मिक्स होऊन सुधा ते पाणी नाइलाजाने येथील नागरिक पितात यावर तोंडी कळवले असताना देखील कोणतीही अंमलबजावणी झाली नाही ही शोकांतिका आहे…असेही यावेळी बोलताना कवडे म्हणाले.

पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, ड्रेनेज लाईन संदर्भात केलेले अधिकाऱ्यांना केलेले फोन टाळले जातात व नागरी समस्येकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात ही बाब गंभीर आहे , आज नागरिकांच्या प्रश्नावर शांततेच्या मार्गाने केलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ नागरी समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे निषेध आंदोलन केले जाईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष सुरेश ऊर्फ बाळा कवडे यांनी व्यक्त केले.

या आंदोलनावेळी माजी नगरसेविका अमृता ताई बाबर यांनी सर्व नागरिक समस्या जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ उपाय योजना कराव्यात असे सांगितले.

आंदोलनाच्या ठिकाणी युवा नेते स्वराज बाबर,उदयसिंग मुळीक, सुनील मोहिते, गौरव कोतवाल, ज्ञानेश्वर वाघमोडे, सरपंच अंकुश धिंडले, नितीन नाडेकर, कालिदास रेणुसे, इरफान खान, व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते…

 

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व आज मांडलेल्या नागरी प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. पाणी, ड्रेनेज लाईन, कचरा, या सर्व नागरी समस्या तात्काळ सोडवल्या जातील.. ज्या ठिकाणी पाण्यामध्ये मैलायुक्त पाणी मिक्स होते ते तात्काळ दुरुस्त केले जाईल.

ज्योती धोत्रे.
साहाय्यक आयुक्त महापालिका
कोंढवा येवलेवाडी
क्षेत्रीय कार्यालय पुणे.

 

 

ज्या नागरिकांना वीज बिल वेळेवर भेटत नाहीत त्यांना वीज बिल वेळेवर मिळेल,खांबावर धोकेदायक असणाऱ्या केबल्स काढल्या जातील. व भूमिगत केबल टाकून दिल्या जातील.

ज्या नागरिकांचे थकीत वीज बिल असेल अशा नागरिकांना हप्त्याची सोय करून दिली जाईल. व नागरिकांना वीज वितरण विभागाकडून सहकार्य केले जाईल…

श्री.शिवलिंग बोरे.
सहाय्यक अभियंता
कात्रज पुणे

1