आळंदीत विविध उपक्रमांनी आंबेडकर जयंती साजरी

629

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील विविध सेवाभावी संस्था, शासकीय,अशासकीय संस्था, पोलीस स्टेशन,आळंदी नगरपरिषद सार्वजनिक ,खाजगी शाळा आदी ठिकाणी रक्‍तदान शिबिर, कपडे वाटप, विविध स्पर्धा, सामूहिक बुद्धवंदना अशा विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच भरगच्च कार्यक्रमांनी आळंदीत आंबेडकर जयंती गुरूवारी (दि.१४ ) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विविध राजकीय पक्ष, संस्था व संघटनांचा सहभाग होता.
आळंदी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी किशोर तरकसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी नगरसेविका सुनीता रंधवे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले-पाटील, अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा कुऱ्हाडे, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष तुषार रंधवे, ज्ञानेश्‍वर बनसोडे, राजेंद्र रंधवे, मनसेचे शहराध्यक्ष किरण नरके, आरिफ शेख, अक्षय रंधवे, अरूण घुंडरे, दत्तात्रय सोनटक्के, महेश घुंडरे, सिद्धार्थ ग्रुपचे विश्‍वजीत थोरात, चेतन रंधवे, अर्चना रंधवे आदी उपस्थित होते.
महासभेच्या वतीने केलेल्या पाठपुराव्यानंतर आळंदी नगरपरिषदेने डॉ. आबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची रंगरंगोटी व अन्य कामे पूर्ण केल्याबद्दल शहराध्यक्ष तुषार रंधवे यांनी नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले. भारतीय बौद्ध महासभेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात पार पडलेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष तुषार रंधवे यांनी तर सिद्धार्थ ग्रुपच्या कार्यक्रमात पोलीस निरिक्षक रमेश पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा व सिद्धार्थ ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष अशोक रंधवे पाटील युवा मंच व केंद्रीय मानवाअधिकार यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या राहत्या घराच्या प्रांगणात भव्य मंडप उभारून अतिशय उत्साही वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, राज्य मानव अधिकार उपाध्यक्ष रामचंद्र कुऱ्हाडे पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील, मनोज कुऱ्हाडे पाटील, मंगेश आंद्रे, मिलिंद पाटोळे, माजी नगरसेवक मृदुल भोसले, आरपीआयचे संदीप रंधवे,  एस .टी. महामंडळातील माजी सेवानिवृत्त कर्मचारी तुकाराम रंधवे , सदाशिव अमराळे, नंदकुमार गोडसे, किरण नरके, ज्ञानेश्वर शेटे, बाळासाहेब चौधरी, महादेव पाखरे, अर्जुन मेदनकर, गोविंद तौर, ऍड. विलास काटे, माजी कॉन्स्टेबल भरत वेताळ, बाळासाहेब पेटकर, बाळासाहेब डफळ, माजी सरपंच सुरेश थोरवे, सागर हिंगणकर, स्वप्निल रंधवे, पांडुरंग इंगळे, दीपक वाघ, सागर कु-हाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अनेक चाहत्यांनी बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊन पुष्पांजली अर्पण केली. सुमित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.जयंती दिनी. रंधवे पाटील परिवाराच्या वतीने सगेसोयरे, मित्रमंडळी, विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, नागरिक, भाविक आदींना सुरुची भोजन महाप्रसाद वाटप करण्यात आले. अनेक वर्षांपासून उपक्रम राबविला जात असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अशोक रांधावे पाटील यांनी सांगितले.
ध्यास प्रशालेत जयंती उत्साहात साजरी
येथील ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर विभागांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यास म्हणून डॉ. निलेश रंधवे, अनिकेत भोसले, अध्यक्ष युथ फौंडेशन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी आदी उपस्थित होते. स्वागत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे व भगवान महावीर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता चौथी मधील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन गायन केले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी सांगितली. इयत्ता बालवाडी ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भाषण केले. गत वर्षात प्रशालेत विविध स्पर्धा व बालसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपशिक्षिका मनिषा दरेकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व भगवान महावीर यांच्या विषयी माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. निलेश रंधवे, युथ फौंडेशन अध्यक्ष अनिकेत भोसले यांनी सर्व महात्म्यांना त्रिवार अभिवादन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. नीलेश रंधवे यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थी जीवनात प्रतिकूल परिस्थिती मध्ये देखील कशाप्रकारे शिक्षण घेतले, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी, स्मिता गायकवाड, मनिषा दरेकर, गोपाळ उंबरकर, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत भोसले आदी उपस्थित होते. आभार गोपाल उंबरकर यांनी मानले. सूत्रसंचालन स्मिता रंधवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या खराडे, धनश्री राळे, मीरा जवादवार, शोभा बोंबटकर, कल्पना मोहिते यांनी परिश्रम घेतले.
जयंती दिनी ५० रक्तदात्यांचे उत्साहात रक्तदान
आळंदी-मरकळ रस्त्यावरील चऱ्होली खुर्द येथील तनिष सृष्टी परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. चिंचवड येथील मोरया ब्लड बॅंकेच्या वतीने रक्‍त संकलीत करण्यात आले. या सोसायटीच्या आवारात निबंध, रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांबरोबरच लहान मुलांसाठी सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक उपक्रमांतर्गत सुरक्षा रक्षकांना पूर्ण पोशाख तर महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. खंडोबा मंदीर रस्त्यावरील भाजी मंडईमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे हस्ते करण्यात आले.
पथारी सुरक्षा दल आळंदी शहर तर्फे जयंती साजरी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल आळंदी शहराच्या वतीने संघटनेच्या भाजी मंडई येथील शाखेत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट साहेब यांनी दूरध्वनीद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सुनिता रंधवे, दक्षता फाउंडेशन अध्यक्षा पुष्पाताई कु-हाडे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा कार्याध्यक्ष निलम सोनवणे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, पत्रकार एम.डी.पाखरे, आयमा मीडियाचे जनार्धन सोनवणे, झोपडपट्टी सुरक्षा दल आळंदी शहर अध्यक्ष संतोष सोनवणे, सरचिटणीस सदाशिव साखरे, कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल आळंदी शहर अध्यक्ष सोमनाथ साखरे, कार्याध्यक्ष नानासाहेब मोरे, बाबु लोहार, गणेश काळे, रमेश शेलार भाजी मंडई शाखा अध्यक्ष गणेश मुंजाळ, निलेश ढोकणे, रायबोले महाराज, दक्षता फाउंडेशनच्या प्रभाताई अरबट, मालनताई घुंडरे, वैशालीताई रंधवे, सुशिलाताई मंजुळे, शुभांगी जाधव, रुपाली पानसरे, भारतीय जनता पार्टी आळंदी शहर संघटन सरचिटणीस भागवत काटकर, यशवंत संघर्ष सेना प्रदेशाध्यक्ष विष्णु कुऱ्हाडे, पोलीस मित्र वेलफेर असो. प्रदेशाध्यक्ष शिवाजी जाधव, यलगार सेना शहराध्यक्ष बाळासाहेब कवलासे, महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल संलग्न पथारी सुरक्षा दल, दलीत विकास आघाडी, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना व विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक निलम सोनवणे यांनी केले. सुत्रसंचालन संतोष सोनवणे यांनी केले. आभार सोमनाथ साखरे यांनी मानले.
भाजपचे वतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी
आळंदी शहर भाजपच्या कार्यालयात जिल्हा सचिव धमेंद्र खांडरे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, अध्यात्मिक आघाडी प्रदेश सदस्य संजय घुंडरे, शहर कार्याध्यक्ष बंडूनाना काळे, ओबीसी आघाडी शहराध्यक्ष मयूर बनसोडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आकाश जोशी, संघटक भागवत काटकर, सदाशिव साखरे, ज्ञानेश्वर बनसोडे, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश जोशी, प्रितम किर्वे, यशवंत संघर्ष सेना महा.राज्य अध्यक्ष विष्णु कुऱ्हाडे, पोलीस मित्र वेलफेर असो. महा.राज्य अध्यक्ष शिवाजी जाधव, यलगार सेना शहराध्यक्ष बाळासाहेब कवलासे, सिद्धेश्वर सलगर, शिवा संघटना आळंदी शहर पदाधिकारी माऊली बुधवंत, नारायण घोलप, माऊली जगताप, धोत्रे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संजय घुंडरे यांनी केले. सुत्रसंचालन भागवत काटकर यांनी केले. आभार किरण येळवंडे यांनी मानले. सांगता पसायदानाने झाली. याशिवाय शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांनी आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आळंदी पोलीस स्टेशन मध्ये डॉ. आंबेडकर जयंती साजरी
येथील आळंदी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, दक्षता सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष किरण नरके यांचे उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ज्ञानेश्वर शेटे, शहादेव गोरे, माजी नगरसेविका उषा नरके, माजी नगरसेविका मालन घुंडरे, शुभांगी यादव, सुशीला मंजुळे, लता मिढे, प्रभाताई अरबाट, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे, कामगार नेते अरुण घुंडरे, नियती शिंदे, कृपाली गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो आळंदी : आळंदी नगरपरिषद कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.