अलंकापुरीत एकादशी दिनी दर्शनास गर्दी हैबतबाबा दिंडीची नगरप्रदक्षिणा

408

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील एकादशी दिनी आळंदी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रींना फराळाचा महानैवेद्य झाला.
हजारो भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी निमित्त नित्यनैमित्तिक हैबतरावबाबा दिंडीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. यावेळी श्रींचे वैभवी दर्शन भाविकांनी रांगा लावत घेतले. मंदिर प्रदक्षिणा, नगरप्रदक्षिणा,इंद्रायणी नदीवर स्नान हरिनाम गजरात करीत एकादशी धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली.
आळंदी मंदिरात भाविकांनी मंगळवारी ( दि.२६ ) एकादशी दिनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. तत्पूर्वी आळंदी मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कोरोंनाचे नियमांचे पालन करून दर्शन खुले करण्यात आले. दुपारचा महानैवेद्य झाला. हैबतराव बाबा दिंडीची हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाली. दरम्यान भाविकांनी श्रींचे दर्शनास मंदिर परिसरात तसेच इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.
आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस गर्दी केली. मानकरी, सेवक यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.
ह.भ.प. ज्ञानोबा महाराज रणदिवे चोपदार यांचे पुण्यतिथी निमित्त देहू गाथा मंदिर अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. परंपरेने एकादशी निमित्त देहूकर यांचे वतीने कीर्तनसेवा हरिनाम गजरात झाली. दरम्यान दुपारी हरिपाठ भजन उत्साहात झाल्याचे मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. यावेळी माऊली पालकी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी योगेश सुरू, योगीराज कु-हाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिरात महिने महाचे आळंदी पंढरपूर आळंदी पायी वारी करणारे वारकरी यांची हैबतरावबाबा यांचे दिंडीतून नगरप्रदक्षिणा व मंदिरात हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षिणा झाली. मंदिर परंपरेने हरिपाठाचे भजन झाले.