वानवडीमध्ये स्लॅप कोसळून ५ कामगार जखमी ; एकाची प्रकृती गंभीर

548

वानवडी प्रतिनिधी

वानवडी येथील एस आर पी एफ गेट नं २ जवळ बोहरी समाजाचे समाजमंदिराचे स्लॅप भरण्याचे काम सुरु असताना  अचानक स्लॅप कोसळून ५ कामगार खाली कोसळून जखमी झाले असून त्यामधील एकाची प्रकुती गंभीर असून  त्यांच्यावर वानवडी मधील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत . यावेळी शेजारी राहणाऱ्या महिलांनी हि घटना प्रत्यक्ष पाहिल्याने त्या प्रचंड भयभीत झाल्या होत्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भाजपाचे युवा नेते महेश पुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप उर्फ राहुल  जगताप यांनी त्वरित घटना स्थळी भेट देऊन जखमींना त्वरित रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. वानवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून घटना कशी घडली याबाबत पोलीस तपास सुरु आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवान आणि उपलब्ध कामगार मलबा हटविण्याचे काम करत आहेत.

  याचदरम्यान विकासनगरला जाणाऱया  रस्त्यावर  एसआरपीएफने सीमाभिंत बांधल्याने येथील नागरिकांना येण्याजाण्यासाठी पायवाट उपलब्ध आहे. यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी घटना पाहण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींना घेराव टाकून भिंत हटविण्यासाठी टाहो फोडला , याचदरम्यान एका महिलेला चक्कर आली यावरून नागरिक अधिकच संतप्त झाले आणि रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली.