आत्मक्लेश जनतेच्या हितार्थ आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे

261

आळंदी (अर्जुन मेदनकर ) : चला जागऊया महाराष्ट्र माझा ! आंदोलन नाही कोणाच्या विरोधात, नाही कोणाच्या समर्थनार्थ, आमचा आत्मक्लेश जनतेच्या हितार्थ हे ब्रीद वाक्य घेवून माहिती अधिकार कार्यकर्ते आदर्श सरपंच कुंडलिक कोहिनकर, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बुट्टे यांनी खेड पंचायत समिती समोर सुरु केलेले आत्मक्लेश आंदोलन तिसऱ्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या हस्ते लिंबू सरबत घेत मागे घेऊन स्थगित केले.
राज्यात नेते मंडळी बाष्फळ बडबड करुन ऐकमेकांच्या विरोधात किंवा धर्माबाबत बोलुन बहुजन समाजामध्ये, जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करीत आहेत. हे करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची सामाजिक व लोकहिताचे जाण नाही. भडकावू वक्तव्य करून पोलिस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणे वरती मोठया प्रमाणात दबाव आणला जात होता. समाजहित, लोकहिताची कामे करणे ऐवजी नेत्यांचे बाष्फळ वक्तव्यांमुळे राज्यातील जनतेमध्ये असमाधान आहे. त्याचाच एक भाग म्हणून खेड पंचायत समितीसमोर आदर्श सरपंच कुंडलिक कोहिनकर, सामाजिक कार्यकर्ते गोविंद बुट्टे यांनी तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन केले. तालुक्यातील जनतेमधून त्यांच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्यातील नेते भडकावू भाषण करीत असल्याने या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाही मार्गाने आत्मक्लेश आंदोलन केले.
तिसऱ्या दिवशी आत्मक्लेश करणारे सामाजिक कार्यकर्ते कुंडलिक कोहिनकर, गोविंद बुट्टे यांची उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी भेट घेतली. त्यांना लिंबू सरबत पाजून आंदोलनाचा समारोप केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील म्हणाले, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अनुसरून कोहिनकर आणि बुट्टे यांचे आत्मक्लेश आंदोलन महत्वाचे बनले. आंदोलनातील मुद्दे समाजासाठी उपयोगी आहेत. त्यांच्या आंदोलनाला यश मिळेल त्यांचे म्हणणे वरिष्ठ पातळीवर त्यांच्या या आंदोलनाची दखल घेतली जाईल.
यावेळी तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे खेड तालुका अध्यक्ष प्रकाश पाचारणे, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी, खेड तालुका उपाध्यक्ष अर्जुन मेदनकर, आंदोलनकर्ते कुंडलिक कोहिनकर, गोविंद बुट्टे, पांडुरंग कोहिनकर, सीताराम आरुडे, किसन गोपाळे, कोहिनकर वाडी सरपंच वैशाली कोहिनकर, शरद कोहिनकर, गौतम पाटोळे, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांच्यासह माहिती अधिकार कार्यकर्ते, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकाश पाचारणे यांनी केले. आभार पै. बाळासाहेब चौधरी यांनी मानले.