स्वकुळ साळी ज्ञातीगृहाच्या वर्धापन दिनाचे आयोजन

272

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील स्वकुळ साळी समाज बांधवांच्या वतीने राज्यातील भाविक , भक्तांसह समाज बांधवांच्या आळंदीत सोयीसाठी भव्य वास्तू परिश्रम पूर्वक विकसित करण्यात आली. या स्वकुळ साळी ज्ञातीगृहाच्या इमारतीत श्री भगवान जिव्हेश्वर महाराज यांची मूर्ती, माता अंकिनी, दशांकिनीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यास १७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त स्वकुळ साळी ज्ञातीगृहाच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे खजिनदार मनोहर दिवाणे यांनी सांगितले.
स्वकुळ साळी ज्ञातीगृहाच्या १७ व्या वर्धापन दिना निमित्त रविवारी (दि.८) गंगा पुजन करण्यात येणार आहे. या प्रसंगी उद्योजक दीपक अरबुणे, सेवा निवृत्त वरिष्ठ मॅनेजर एम.टी.एन.एल अनिल सातपुते, उद्योगपती स्वकुळरत्न जे.आर.दळवी, विद्यार्थी सहाय्यक मंडळ अध्यक्षा श्रीमती शांताबाई जंत्रे, अक्षय चंदावरकर, उद्योजक शिरीष जठार उपस्थित रहाणार आहेत.
विविध कार्यक्रमात गंगापूजन, श्री ज्ञानेश्वर महाराज यांची महापूजा, भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांची पंचामृत महाअभिषेक पूजा, वर्धापन दिना समवेत कृतज्ञता दिन म्हणून साजरा केला जातो. यात ५ मरणोत्तर सन्मान आणि संस्थेचे कार्यास योगदान देणाऱ्या ५ मान्यवरांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. समाजातील गुणवंत विदयार्थी यांचा सत्कार, ७५ व्हायरशावरील समाजातील जेष्ठांचा सत्कार, तसेच कोरोना महामारीचे काळात केलेल्या विशेष सेवेचे कार्य केले त्यानिमित्त पोलीस, आरोग्य कर्मचारी, आरोग्य अधिकारी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, क्रीडाक्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव यासह वैयक्तिक सेवा कार्य आणि संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवर समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत हावरे, उपाध्यक्ष अमित उगले, सचिव देवेन क्षीरसागर, सहसचिव प्रवीण जुंदरे, खजिनदार मनोहर दिवाणे तसेच सर्व सभासद पदाधिकारी परिश्रम पूर्वक नियोजन करीत आहेत. या वर्षीचे कार्यक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे वतीने अध्यक्ष चंद्रकांत हावरे, खजिनदार मनोहर दिवाणे यांनी केले आहे.