Friday, March 21, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेआळंदीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

आळंदीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर)

येथील आळंदी नगरपरिषद, आळंदी पोलीस स्टेशन, आरंभ फाउंडेशन,यशवंत संघर्ष सेना, आळंदी जनहित फाउंडेश, एल्गार सेना, सकल धनगर समाज, झोपडपट्टी सुरक्षा दल यांचेसह विविध सेवाभावी संस्था, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती विवीध सामाजिक उपक्रमांनी तसेच अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेस,अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने साजरी करण्यात आली.

अहिल्यादेवी समाज धर्मशाळेत याप्रसंगी यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य अश्याक्ष विष्णू कुऱ्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर, महिला आघाडी कार्याध्यक्ष योगिता काटकर, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ओबीसी आघाडी शहराध्यक्ष माउली बनसोडे, शिवा संघटना अध्यक्ष सदाशिव साखरे, मल्हारी कानडे आदींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती सांगून जीवन कार्याची ओळख करून दिली. विनोद पगडे, आप्पा पगडे, शिवाजी जाधव, करण कोल्हे,अर्जुन मेदनकर, दिनेश कुऱ्हाडे, बाळासाहेब वायकुळे यांचेसह विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर म्हस्के आदी उपस्थित होते.
आळंदी येथील पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे नियंत्रणात पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचेसह विविध सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी यांचे उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादनाने जयंती साजरी करण्यात आली. आळंदी नगरपरिषदेत राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कर निरीक्षक रामराव खरात, लेखापरीक्षक विशाल बासरे, बांधकाम विभाग प्रमुख सचिन गायकवाड, मनोज राठोड, अभिषेक उमरगेकर, संदीप रंधवे, शिरीष कारेकर, अर्जुन मेदनकर, विष्णू कुऱ्हाडे, भागवत काटकर, दिनेश कुऱ्हाडे,सागर भोसले, ज्ञानेश्वर भोसले, मनोहर बोरगे, नानासाहेब घुंडरे आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते. आळंदीतील भाजी मार्केट मध्ये झोपडपट्टी सुरक्षा दलाचे वतीने प्रमुख संतोष सोनवणे यांचे मार्गदर्शनात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रतिमा पूजन , पुष्पांजली अर्पण करीत साजरी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!