पुणे महानगरपालिकेच्या शाळांची मोठ्या उत्साहात सुरुवात….

448

गणेश जाधव, पुणे

पुणे महानगरपालिकेच्या सर्व माध्यमाच्या शाळा बुधवारी मोठ्या उत्साहात सुरूवात झाल्या. शाळांमध्ये प्रवेशद्वारापासून रांगोळ्या, फुग्यांची आकर्षक सजावट, स्वागतासाठी लेझीम पथक, बँड पथक इत्यादींच्या माध्यमातून उत्तम वातावरण निर्मिती करण्यात आली.

मा. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी पुणे मनपाच्या आचार्य विनोबा भावे प्राथमिक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व शालेय पुस्तके देऊन स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधला.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विलास कानडे प्रशासकीय अधिकारी (प्राथमिक) डॉ. मीनाक्षी राऊत, माध्यमिक व तांत्रिक विभागाचे शिक्षणाधिकारी पोपट काळे तसेच शिक्षण विभागाचे सर्व उप प्रशासकीय अधिकारी सहायक प्रशासकीय अधिकारी पर्यवेक्षक व क्रीडा अधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी तयार केलेला ‘सेतू अभ्यास इयता २ री ते १० या वर्गासाठी पुढील ३० दिवस सर्व शाळांमध्ये घेण्यात येणार आहे…