पुण्यनगरीमध्ये  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मोठ्या जलोषात स्वागत

346

अनिल खुडे, पुणे

पुण्यनगरीमध्ये  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे  विश्रांतवाडीमध्ये  स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजी महाराज यांनी मोठ्या जलोषात ,उत्सहात  स्वागत केले तसेच पुणे मनपाच्या वतीने आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

    माउलींच्या पालखींचे स्वागता वेळी विविध संघटनांकडून रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. यावेळी माउलींच्या  स्वागतावेळी शाशकीय, प्रशासकीय अधिकारी , महापालिकेचे अधिकारी, पोलीस प्राशासनाने माऊलींचे आणि वारकरी यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज यांनी माउलींच्या पालखी रथापुढे फुगडी खेळून वारकऱ्याना प्रोहोत्सान दिले.