सूर्योदय प्रतिष्ठान संचलित आनंदी घर तर्फ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राज्य स्तरीय पुरस्कार वितरण संपन्न

234

पुणे प्रतिनिधी,

सूर्योदय प्रतिष्ठान संचलित आनंदी घर तर्फ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राज्य स्तरीय नारीरत्न, गुणवंत शिक्षक, समाजरत्न, कोरोना योद्धा, युवा उद्योजक, क्रीडा,सर्पमित्र, शिक्षण पुरस्कार 2022देऊन गौरवीण्यात आले.अशी माहिती सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा सौं प्रतिभाताई पाटील यांनी दिली. प्रतिभा पाटील यांनी खडी मशिन चौक येथील सिल्वर हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्री. शिवाजीराजे जाधवराव,(लखोजीराजे जाधवराव सिदखेड राजा यांचे थेट वंशज) ऍडव्होकेट.श्री.प्रभाकर तावरे पाटील (माजी सह.आरोग्य अधिकारी पि.चि.म.न.पा) वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशनं श्री.सरदार पाटीलसाहेब , मा. श्री. एस. के. धर्माधिकारी साहेब. (चेअरमन- Road Tunel advisory comitee मिनिस्ट्री ऑफ रोड, ट्रान्सपोर्ट, हायवे ज भारत सरकार )प.पू. सद्गुरू नारायण (अण्णा) महाराज नारायणपूर ,श्री.गुलाबराव पाटील(अध्यक्ष खान्देश मराठा मंडळ पि.चि.पुणे परिसर), डॉ. किरण शहा, (वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त डॉ. बदोरवाला कुष्ठरोगी रुग्णालय रुग्णालय कोंढवा पुणे ) श्री दत्ता नलावडे(जेष्ठ इतिहास संशोधक व लेखक सल्लागार स्वराज रक्षक संभाजी मालिका )श्री. गोपालजी बिरारी (राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस प्रात संघ) श्री.सचिन निंबाळक( सामाजिक कार्यकर्ते) श्री.अशोक पाटणे (संचालक रामराज्य शिक्षण संस्था ), श्री.जुगकिशोर पुंगलिया(श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्था) , रियाजभाई सय्यद(सामाजिक कार्यकर्ते ), सौं अनिता दीक्षित, रफिक शेख, श्री श्रीकांत गाडेकर उपस्थित होते. पुरस्कारार्थी- राजेंद्र भिंताडे, डॉ. दादासाहेब जगताप, स्नेहल दगडे, महादू पाटील, नदाभ हुसेन मेहबूब, अॅड. पियाली घोष, निवृत्ती बांदल, शिवाजी जाधव, हेमराज विसावे, भानुप्रिया पाटील, राधिका तनपुरे, अक्षय मारणे, अनंतराव भोसले, रवींद्र वर्पे, प्रेमकला पाठक, पंढरीनाथ वाडेकर, गोपाल खंडारे, सुरेखा सूर्यवंशी, नूतन पाटोळे, मनोज धुमाळ, रखुमाबाई भोसले, डी. टी. सावंत, अॅड. प्रिया शहा, रंगनाथ अवताडे,सुनील पाटील, तर सन्मानपत्र मतीन शेख, हनुमाननगर क्रिकेट क्लब,लेप्रेशी वस्ती हनुमान नगर पिसोळी दत्तगुरू क्रिकेट क्लब. कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी महेंद्र पाटील, सोमनाथ कामठे, संतोष धुमाळ, अमित जगताप,शमशाद पटेल, सचिन पाटील, राजेशकुमार जैस्वाल, योगेश देशमुख, वर्षो पाटील, दीपाली पाटील, अमित जगताप, समीर शेख, विशाल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रम प्रसंगी साक्षी बाळासाहेब जाधव कै.सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणार्‍या मुलीचे शैक्षणिक पालकत्व सूर्योदय प्रतिष्ठान अध्यक्ष प्रतिभाताई पाटील यांनी 12वी ते सी ए (CA) होईपर्यन्त घेतले असून सर्व खर्च करणार असल्याचे जाहीर केले.