ब्रम्हमुहूर्त योग् ज्ञानपीठ केंद्र  “गुरुपौर्णिमा”  महोत्सव उत्सहात साजरा

661
पुणे प्रतिनिधी,
ब्रम्हमुहूर्त योग् ज्ञानपीठ केंद्रातर्फे कोंढवा येथील लोणकर लॉन्स याठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव अतिशय उत्सहात आणि राजकीय ,सामाजिक ,शैक्षणिक ,प्रशासकीय अधिकारी आणि साधक परिवारांच्या  उपस्थित आदरणीय गुरुदेव श्री दीपक महाराज आणि गुरुमाऊली वैशालीजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानरूपी आशीर्वादाने मोठ्या उत्सहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
     गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी कोंढवा हॉलच्या सर्व साधकांनी विशेष तयारी केली होती. यासाठी सर्व साधक मोठ्या उत्सहात आणि आंनदात होते. *विशेषतः  गणेश नलावडे* सरांनी मोठी तयारी केली होती. त्यांना राजेंद्र भिंताडे, विजय लोणकर, कालिदास लोणकर, उर्मिला भालेराव, शशिकांत पुणेकर, सतीश शिंदे, महेश भोईटे, संतोष गोरड, संजय पडवळ, प्रसाद गव्हाणे, प्रदीप पवार, भानुदास होले, दर्शन किराड, अजित लोणकर , नवनाथ गोते ,अनिल चौधरी यांनी सहकार्य केले.
   आदरणीय गुरुदेव श्री दीपक महाराज यांचे स्वागत केंद्राच्या वतीने  फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि  जल्लोषात स्वागत करण्यात आले . गुरुदेव,गुरुमाऊली यांना प्रथम फेटे बांधून त्यांचे ढोल लेझीम व पारंपारिक पद्धतीने स्वागत केले गेले . गुरुदेव स्थानापन्न झाल्यावर देखील नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी केली गेली. यावेळी शिवछत्रपतींचा देखील जयजयकार करण्यात आला. यांनतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी गुरुदेवांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करून प्राणायम आणि मेडिटेशन देखील घेतले. 
आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केंद्राचे अध्यक्ष शशिकांत आंनदास व अध्यक्षा अश्विनी पासलकर यांनी केले.
याप्रसंगी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर, मा . नगरसेवक तानाजी लोणकर, साईनाथ बाबर, भरत चौधरी, राणी भोसले , रंजनाताई टिळेकर, राजाभाऊ कदम, मनीषा कदम, वृषाली कामठे, नंदाताई लोणकर, जनसेवक राजेंद्र भिंताडे,  समीर धनकवडे,  संजय लोणकर, उमेश दांगट, सुधीर कोंढरे, महेश पुंडे , युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहिल केदारी, महेंद्र लोणकर, सतीश शिंदे, अमोल शिरस, समीर शेंडकर, संदीप बेलदरे ,प्रसाद बाबर, राजेंद्र बाबर, सुशांत ढमढेरे , प्रशासकीय अधिकारी अनिल बांगर आणि सर्व केंद्राचे कोचर , साधक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महाप्रसाद सेवा अजित लोणकर यांच्या वतीने देण्यात आली होती तर अप्रतिम साउंड सिस्टीमची सेवा मयूर ढोकळे यांनी दिली होती. आभार केंद्राच्या वतीने अश्विनी पासलकर यांनी मानले.
   एकंदरीत ब्राम्हमुहूर्त  ज्ञानपीठ केंद्राचा   “गुरुपौर्णिमा”  महोत्सव न भूतो न भविष्यती झाला  असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र भिंताडे यांनी  याप्रसंगी व्यक्त केली