पुणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण शाळांमधील ४५० मुलींना  लीला पुनावाला फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती.

217

पुणे प्रतिनिधी,

लीला  पुनावाला फाउंडेशन (एलपीएफ)  कडुन   ७ वी इयत्तेतील ४५० शालेय मुलींना नुकतीच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. पुणे शहर, गावडेवाडी, चांदोली, खडकी आणि पिंपळगाव यांसारख्या गावांतील गुणवंत परंतु आर्थीकदृष्या दृर्बल व आवश्यक शैक्षणिक सुविधांचा आभाव असलेल्या शाळकरी मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली.

एलपीएएफच्या ‘टूमारो टूगेदर’ या शालेय शिष्यवृत्ती प्रकल्पाचे हे १२ वे यशस्वी वर्ष आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यापासून पुणे शहर आणि पुण्याच्या ग्रामीण भागांतील १५ शाळांमधील सुमारे २,७०० शालेय मुलींना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यात आत्तापर्यंत ७ व्या इयत्तेपासून ते पदवीपर्यंतच्या १० वर्षांच्या वचनबद्धतेसह शिष्यवृत्ती अनुदान देण्यात आले आहे, जे या प्रकल्पाचे वेगळेपण आहे.  

या शिष्यवृत्ती प्रकल्पांतर्गत, शालेय मुलींना त्यांची फी, स्कूल बॅग, रेनकोट, शूज, मोजे, गणवेश आणि पुस्तके यासारख्या शालेय साहित्यासाठी आर्थिक मदत केली जाते. आर्थिक मदतीच्या पलीकडे जाऊन या मुलींना आरोग्य शिक्षण, स्व-संरक्षण प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण, समुपदेशन, एक्सपोजर भेटी, करिअर मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे भविष्यात त्या स्वतंत्र आणि आत्मविश्वासू बनु शकतात. या सर्वसमावेशक पाठिंब्यामुळे या मुली भविष्यात आर्थीकरित्या स्वतंत्र होऊन स्वताच्या पायावर उभ्या राहू शकतात.

या शिष्यवृत्ती पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून मुलींना शिष्यवृत्ती देऊन सत्कार करणाऱ्या पाहुण्यांमध्ये उपस्थित होते -राजेंद्र सारंगी (डायरेक्टर फायनांन्स आणि कंपनी सेक्रेटरी, होगानास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) आणि सुनील विश्वनाथ वळसे पाटील (प्राचार्य, कालभैरवनाथ सौ. लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालय, खडकी, पिंपळगाव).

याचसोबत इतर सहभागींंमध्ये लीला पुनावाला ,पद्म श्री(अध्यक्षा , संस्थापक एलपीएफ), फिरोज पुनावाला ( संस्थापक विश्वस्त, एलपीएफ ), रोडा मेहता , विनिता देशमुख ( बोर्ड ऑफ ट्रस्टी) आणि प्रिती खरे (सीईओ, एलपीएफ) उपस्थित होते.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना लीला पुनावाला (पद्म श्री ) म्हणाल्या, “माझी पालकांना विनंती आहे की, पालकांनी पैश्यांची बचत करून ते मुलींच्या शिक्षणावर खर्च करावे, हुंड्यावर नाही. तुम्ही त्यांना शिक्षण द्या आणि त्या त्यांच्या कमाईच्या रूपात दर महिन्याला हुंडा घरी आणतील व आई-वडील आणि सासरचे दोघांचीही काळजी घेतील.”

यावेळी फिरोज पुनावाला म्हणाले, “टूमारो-टुगेदर- एलपीएफ स्कूल प्रोजेक्ट माझ्यासाठी खुप खास आहे कारण या प्रकल्पाअंतर्गत गेल्या १२ वर्षांपासून आमच्या मुलींच्या जीवनात होणारे बदल आम्ही खुप जवळुन पाहिले आहेत. ज्या एकेकाळी सातवीत शिकणार्या लहान मुली होत्या ज्यांच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने होती त्यांच्या जीवनात झालेले अमुलाग्र बदल, त्यांचे उज्वल भविष्य पाहून आज आम्हाला खुप अभिमान वाटतो.”

या वर्षीच्या बॅचमधील शिष्यवृत्ती प्राप्तकर्त्यांपैकी एक, पुण्यातील एलपीएफ समर्थित शाळेतील विद्यार्थीनी आर्या परमार म्हणाली, “ एलपीएफमुळे, मी आता अभ्यास करू शकते आणि माझी स्वप्ने पूर्ण करू शकते. लीला मॉम , फिरोज बाबा आणि एलपीएफच्या दीदी अशा दयाळू एलपीएफ कुटुंबाचा एक भाग बनणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे . शिक्षण घेण्यासाठी स्वप्ने साकार करण्यासाठी एलपीएफकडून मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांची मनापासुन आभारी आहे.”