पुणे शहरातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

462

पुणे प्रतिनिधी,

पुणे शहर पोलीस दलात मोठे फेरबदल नऊ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (दि.१४) अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कोठून कोठे
1. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी रामचंद्र बहिरट (खडक पोलीस स्टेशन ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन –

2. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते विशेष शाखा
3. पोलीस निरीक्षक संगिता किशोर यादव (भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन)
4. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद रोहिदास वाघमारे (सिंहगड पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे समर्थ पोलीस स्टेशन-
5. जयवंत राघवेंद्र राजुरकर (गुन्हे शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे सिंहगड रोड पोलीस स्टेशन)

गुन्हे शाखेतील ४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे गुन्हे शाखेतील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
करण्यात आल्या आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने बदल्यांचे आदेश काढले आहेत

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. पोलीस निरीक्षक गणेश माने (युनिट 6 ते युनिट 4
2. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (भरोसा सेल ते अंमली पदार्थ विरोधी पथक -2
3. पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (अंमली पदार्थ विरोधी पथक -2 ते प्रशासन, गुन्हे शाखा-
4. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल (प्रशासन, गुन्हे शाखा ते युनिट 6)
गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस निरीक्षक जयंत राजुकर यांच्या नेमणुकीचे आदेश स्वतंत्रपणे नंतर काढण्यात येणार आहेत.