नवरात्रोस्तवाच्या निमित्ताने ‘वरदाय फौंडेशन’ च्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री-शक्तीचा सन्मान

327

कोंढवा प्रतिनिधी-

नवरात्रोस्तवाच्या निमित्ताने  ‘वरदाय फौंडेशन’ च्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री-शक्तीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी मा. नगरसेवक संजय लोणकर,  लक्ष्मण लोणकर, नितीन लोणकर,  माऊली भोईटे, प्रवीण लोणकर, संतोष गोरड, संजय वांजळे, निलेश ढोणे, राजू वाघ, विजय लोणकर, सागर लोणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सन्मानित केलेल्या स्त्रियांचा परिचय :

१) कोंढवा खुर्द पुणे मनपाच्या संत गाडगे महाराज प्रशालेत प्राचार्य म्हणून कार्यरत असलेल्या सौ. मोमीन मॅडम या सन १९८६ पासून पुणे मनपाच्या शिक्षण मंडळात कार्यरत आहेत. साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत.

 

 

२) पुणे मनपाच्या मीनाताई ठाकरे दवाखाना, कोंढवा खुर्द येथे कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ परिचारीका सौ. लताताई मोरे यांनी कोरोना महामारीच्या काळातील केलेले कार्य उल्लेखणीय आहे. येवलेवाडीच्या सिंहगड महाविद्यालयात सुरु असणाऱ्या कोविड सेंटरमधेही त्या कार्यरत होत्या.

 

   

३) कोंढवा गावातील ज्येष्ठ महिला उद्योजक श्रीमती कौशल्याबाई लोणकर यांचे श्री. संत तुकाराम भुवन स्नॅक्स सेंटर गेल्या पाच दशकाहून अधिक काळ सेवेत आहे. ७७ वर्षीय श्रीमती कौशल्याबाई आजही त्यांच्या कुटूंबीयांसमवेत व्यवसाय सांभाळत आहेत. त्यांची जिद्द अनेक तरूण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

 

 

 

४) कोंढवा गावातील प्रसिद्ध महिला हॅाटेल व्यावसायिका सौ. धनश्रीताई शेखर लोणकर यांचे हॅाटेल शांताई आणि पूजा केटरर्स नावे हॅाटेल संघ आहे. विशेषत: त्यांच्या दिवंगत सासूबाई स्व. शैलजाबाई लोणकर यांनी या व्यवसायाची सुरूवात केली होती आणि हा