पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन आणि पवित्र वातावरणात उघड मोहीम पंढरपूरचे स्थानिक प्रश्न पंढरपूर विकास आराखडा आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे

241

पंढरपूर, ता. ३० : पंढरपूर विकास आराखड्यासाठी टाकळी सरकारने 73 कोटी रुपये इतका भरघोस निधी पंढरपूरसाठी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या विकास निधीच्या उपयोगासाठी अद्यापही प्रशासकीय पातळीवरून म्हणावी तशी हालचाल झालेली नाही. मंदिर परिसरातील भाविकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी अधिक उपयोगी धोरण आखणे आवश्यक आहे. सामान्य नागरिकांना आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.

शिवसेना महिला आघाडी आणि युवा सेना आयोजित ‘बया दार उघड मोहिमे’ साठी आज त्या पंढरपुरामध्ये आल्या होत्या.

यावेळी त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि पंढरपूर देवस्थान आणि श्री. विठुरायाच्या भाविकांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना केली.

त्याचबरोबर या दौऱ्याच्या निमित्ताने राज्यातील महिला भगिनींना सुरक्षा विकास आणि न्यायाची दरवाजे खुले व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी त्यांच्यासोबत पंढरपूरचे शिवसेना पदाधिकारी जिल्हाप्रमुख संभाजी राजे शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उपनेते ज्योती ठाकरे, दीपा पाटील, पुणे शिवसेनेच्या महिला गाडीच्या पदाधिकारी स्वाती ढमाले, विद्या होडे, युवा सेनेच्या शितल शेठ देवरुखकर, शर्मिला येवले आदी उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृह येथे डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला.