कोंढव्यातील माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

639

पुणे  प्रतिनिधी

कोंढव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गफूर अहमद पठाण यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. वाढदिवसाचे बॅनर कंपनीची परवानगी न घेता लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे म्हटले जात आहे.
सदरील होर्डिंगवर कंपनीची जाहिरात सुरू असताना विना परवाना त्या कंपनीची होर्डिंगवर स्वतःचे वाढदिवसाचे बॅनर लावणे पठाण यांना महाग पडले आहे. या जाहिरातीच्या बिलाचे पैसे मागण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याला त्यांनी शिवीगाळ करुन लाथा मारुन पाहून घेण्याची धमकी दिली.
याप्रकरणी अतुल माधव संगमनेरकर (वय ५५, रा. रास्ता पेठयांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद गु. रजि. नं. २९३४/२२ दिली आहे. त्यावरुन हाजी गफुर पठाण वय ४५, रा. कोंढवा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मिठानगर येथील अशोक म्युज सोसायटी मागील बाजुस टी जंक्शन जवळ शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कॅप्शन आऊटडोअर अॅडव्हरटायजिंग या कंपनी मध्ये नोकरीला आहेत.कंपनीचे कोंढवा येथील जाहिरातीचे होर्डिंगवर हाजी गफुर पठाण यांनी आपल्या वाढदिवसाचे बॅनर कंपनीची परवानगी न घेतला लावले होते.

कंपनीचे त्याचे बिल फिर्यादीचे ऑफिसवर पाठविले होते.या बिलाचे रक्कमे साठी फिर्यादी हे पठाण यांना भेटण्यासाठी गेले होते.गफूर पठाण यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथ मारुन पाहून घेण्याची धमकी दिली . त्यामुळे त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करीत आहेत . अधिक माहितीसाठी पठाण यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

 

 

 

 

 

 

 

courtesy:pune city times