पुणे (प्रतिनिधी )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ रामटेकडी येथे काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपला मारून आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे पुणे शहर संघटक इम्रान शेख, बळीराम डोळे यांच्या नेतृत्वाखाली रामटेकडी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात अक्षय बहिरट, मतीन शेख, तौसीब शेख, अनिल हावळे, गणेश रेवले, प्रशांत सूर्यवंशी, अतिक शेख, बाबा शेख, अमीर सय्यद, संदीप झाडे, मुक्तार शेख, अविनाश सरडे, राजू शेख आदिसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉl.बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य शिक्षण व मूलभूत हक्क बहुजन समाजाला मिळावेत म्हणून जगात आदर्श अशी राज्यघटना बनविली आणि खऱ्या अर्थाने शोषित वर्गाला न्याय देण्याचे महान काम केले
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रातील वंचित पीडित शोषित वर्गाला शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून आयुष्यभर संघर्ष केला शिक्षण संस्थेला दोन लाख रुपयांची देणगी नाकारून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही असा निर्वाणीचा इशारा कर्मवीरांनी दिला होता अशा महामानवांबद्दल राज्याचे मंत्री बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान करण्याचा घाणेरडा प्रयत्न करत आहेत, कोल्हापूर वरून पुण्यात येऊन भीक मागून आमदारकी मिळवली आणि मंत्री बनलेले चंद्रकांत पाटील सत्तेचा आणि मंत्रिपदाचा माज दाखवीत आहेत, या वाचाळवीर नेत्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो काँग्रेसच्या वतीने रामटेकडी येथे वाचाळ मंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुतळ्याला जोडे मारून निषेध केला आहे आगामी काळात महामानवांचा अवमान केला तर या वाचाळवीर मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा पुणे शहर काँग्रेसचे संघटक इम्रान शेख यांनी दिला.
रामटेकडी येथे चंद्रकांत पाटील यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन करण्यात येणार होते वानवडी पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार पुतळ्यास जोडे मारून निषेध करण्यात आला.