आळंदी रुग्णालयात १७ वर्षाने सीझर शस्त्रक्रिया यशस्वी

706

वैद्यकीय अधिक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांचा सत्कार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :

येथील आळंदी प्राथमिक आरोग्य केंद्रास दर्जा वाढ मिळून केंद्राचे आळंदी ग्रामीण रुग्णालयात रूपांतर झाल्या नंतर १७ वर्षांनी पहिलीच सीझर शस्त्रक्रिया आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षिका डॉ. उर्मिला शिंदे यांच्या नियंत्रणात यशस्वी झाली. या निमित्त आळंदी जनहित फाऊंडेशनचे वतीने कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन भागवत काटकर यांचे हस्ते आळंदी ग्रामीण रुग्णालयात टीमचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बालरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास कोलाड , स्त्री रोग तज्ञ शेखर घुमटाकार, भूल तज्ञ डॉ. सविता घुमटकर, डॉ. शुभांगी नरवडे, डॉ. वेदांत कोतकर, डॉ. मोनिका देवांग, डॉ. श्रेया कोपर्डे, मृणाल पाटील, डॉ. संयोगिता पाटील, स्टाफ नर्स ललिता डीले, सिस्टर गवांदे, वर्षा गाढवे, नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर, संयोजक अर्जुन मेदनकर, शिवा संघटनेचे आळंदी शहर प्रमुख सदाशिव साखरे, पप्पू बनकर यांचेसह आळंदी ग्रामीण रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
आळंदी येथील भाविक, वारकरी यांचेसह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य सेवा प्रभावी पणे मिळण्यासाठी आळंदी प्राथमिक आरोग्य केंद्रास २००५ मध्ये आळंदी ग्रामीण रुग्णालयास मान्यता देऊन ते सुरु करण्यात आला. आता २०२२ मध्ये आळंदी ग्रामीण रुग्णालय सुरु होऊन १७ वर्ष झाले असून अजून काही सेवा सुविधा अत्याधुनिक यंत्रणा तसेच पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तसेच आरोग्य स्टाफ उपलब्द्ध नसताना आळंदीत वैद्यकीय अधिकारी डॉ. उर्मिला शिंदे यांनी पदभार घेतल्या नंतर पहिली सीझर शस्त्रक्रिया केली. यावेळी प्रसृत महिला प्रकृती स्थिर असून नवजात अर्भक मुलगी सुमारे साडेतीन किलोवर असून पृकृती उत्तम आहे. यावेळी सर्व स्टाफ आणि सहकारी यांनी विशेष सहकार्य केले असून आळंदी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवेचा लाभ नागरिक, भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. येथे प्रसुतीची संख्या देखील वाढली असून बाह्यरुग्ण विभागात देखील नागरिक, भाविक, वारकरी विद्यार्थी रुग्णालयीन सेवेचा लाभ घेत आहेत. उपलब्ध साधन सुविधा आणि यंत्रणा यांचा पुरेपूर वापर करून रुग्णालयात आरोग्य सेवा सुविधा दिली जात असल्याचे डॉ. शिंदे आणि डॉ. कोलाड यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयास आवश्यक उर्वरित कर्मचारी, अधिकारी तसेच स्टाफ मिळाल्यास अधिक प्रभावी सेवा सुविधा देता येतील असे त्यांनी सांगितले.
आळंदी ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय दर्जा मिळावा यासाठी मागणी असून आळंदी हे तीर्थक्षेत्र असल्याने ते मंजूर व्हावे असे माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील यांनी सांगितले. यासाठी पुढे अधिक पाठपुरावा सुरु रहाणार आहे. सद्या ३० बेड रुग्णालयास मंजूर असून तीर्थक्षेत्र असल्याने १०० बेड ची मागणी आहे. संयोजन अर्जुन मेदनकर यांनी केले.