अर्चना शेफर बनल्या मिसेस महाराष्ट्र क्लासिक २०२२.

214

पुणे प्रतिनिधि,

पुण्यातील द प्राईड हॉटेल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य स्पर्धेमध्ये अर्चना शेफर यांनी मिसेस महाराष्ट्र क्लासिक २०२२ चा पुरस्कार आपल्या नावे केला असुन याचसोबत डॉ. शीतल शिंदे यांनी मिसेस महाराष्ट्रचा बहुमान मिळवला

नुकत्याच आयोजित झालेल्या या स्पर्धेमध्ये पुण्यातील उच्चभ्रू लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांसोबतच पैठण आणि रायगड आदि ग्रामीण भागांतील स्पर्धक देखील सहभागी झाले होते. येथे व्यक्तिमत्व, पेहराव, सुंदरता आदि विविध बाबींच्या अनुषंगाणे विजेत्यांची निवड करण्यात आली. जॅझमटाझ वर्ल्ड हे पुण्यातील इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रणेते असुन ते गेल्या ३० वर्षांपासून यशस्वीरित्या विविध सौंदर्य स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. जॅझमटाझ वर्ल्ड ने देशभरातील विविध महिलांना सौंदर्य स्पर्धांच्या या व्यासपीठावर स्वताला सिद्ध करण्याची संधी दिली आहे.फॅशन जगतातील मिसेस पुणे, मिसेस महाराष्ट्र, मिसेस इंडिया, मिसेस इंडिया इंटरनॅशनल आदि प्रसिद्ध स्पर्धांचे आयोजन जॅझमटाझ वर्ल्ड द्वारे गेल्या अनेक वर्षांपासुन केले जाते. ग्रामीण भागातील महिलांना संधी देणे हे देखील त्यांचे उद्दिष्ट आहे , महिला सक्षमीकरणात ते यशस्वी झालो असुन , सर्व माध्यमांकडून ते जास्तीत जास्त सहकार्याची अपेक्षा करत आहेत.