भारतातील पहिले चालते-फिरते सलॉनचे पुण्यात उद्घाटन

203

पुणे : सलॅान ॲपलचा आज ३० वा वर्धापन दिन साजरा झाला . ह्या महत्त्वाच्या दिवसाचे औचित्त्य साधून सलॅान ॲपल ने “सलॅान ॲपल ऑन व्हील्स” लाँच केले . “सलॅान ॲपल ऑन व्हील्स” ही एक बस वॅन आहे जी spectacular salon services ग्राहकांच्या जवळ घेऊन येणार आहे.

सलॅान ऑन व्हील्स ही संकल्पना भारतात घेऊन येणारा सलॅान ॲपल हा पाहिला ब्रॅंड आहे. सगळ्या लगबगीच्या प्रसंगी आणि ग्राहकांच्या सुविधेसाठी सलॅान ॲपल ऑन व्हील्स हा उत्तम पर्याय आहे. हेअर, मेकअप, स्किन संबंधी अनेक सर्व्हिसेसचा लाभ घेणं आता ग्राहकांना खूप सुलभ होणार आहे असे सलॉन ॲपल च्या संस्थापक सौ नयना चोपडे म्हणाल्या.

सलॉन ॲपल च्या सिईओ सौ प्राची चोपडे आम्रे म्हणाल्या, अनेकदा खूप महत्वाच्या प्रसंगी, सलॅान ला जाऊन तयार होणं किंवा हेअर-स्किन- नेल्स ची निगा राखणं अवघड होतं. सलॅान ॲपल ऑन व्हील्स च्या माध्यमातून आता ह्या सगळ्या सर्व्हिसेस साठी ग्राहकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. सलॅान ॲपल ऑन व्हील्स ग्राहकांकडे जाऊन त्यांच्या सोयीने सगळ्या सर्व्हिसेस पुरवणार असल्याने ही संकल्पना लवकरच लोकप्रिय होईल ह्यात काही शंका नाही.

ही बस वॅन नेहमी सॅनिटाइझ केली जाणार असून हायजिन ची विशेष काळजी घेतली जाणार आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सलॅान ॲपल ऑन व्हील्स मध्ये फक्त ब्रॅण्डेड आणि डीस्पोजेबल साहित्य वापरण्यात येणार आहे.

पुण्यातील सोसायट्या, आयटी कंपनीज, कॉलेजेस, वेडिंग हॉल्सना सलॅान ॲपल चे आवाहन आहे की त्यांनी ८७९९९१३७११ ह्या नंबरवर कॉल करुन ह्या सुविधेचा लाभ घ्यावा.