इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. आनंद भन्साळी, सचिवपदी डॉ. प्रतीक राऊत”

277

“वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणी जाहीर”

पुणे (प्रतिनिधी)
इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल ककून येथे डॉ. संजय जोशी, अध्यक्ष, इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पार पडली. या सर्वसाधारण सभेत हडपसर आणि परिसरातील पन्नासहून अधिक दंतवैद्यकांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. व्यासपीठावर डॉ. संजय जोशी, डॉ. अक्षय राऊत, डॉ. प्रतीक राऊत आणि डॉ. नितीन सपाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपूर्वा लोढा यांनी केले. सभेची सांगता सचिव डॉ. प्रतीक राऊत यांच्या निरोपाच्या भाषणाने झाली.

सन २०२२ साठीच्या नवीन कार्यकारणीची घोषणा यावेळी करण्यात आली. आयडीए हडपसर शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ.अक्षय राऊत यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आनंद भन्साळी यांनी आयडीए हडपसर शाखेचा कार्यभार स्वीकारला. सचिवपदी डॉ. प्रतीक राऊत हे कायम असतील. डॉ. रोहित गांधी हे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतील.

नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. आनंद भन्साळी यांनी या वर्षात राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे तसेच स्त्री दंतरोग तज्ञ संमेलन आयोजन करणार असल्याचे सांगितले. यावर्षी पारिवारिक संबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच वैद्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

2022 सालासाठी जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारणी मध्ये डॉ. प्रकाश केळकर, डॉ.हेमंत शहा, डॉ.विक्रम हरीपुरे, डॉ.मनोज कुलथे, डॉ.जयदीप फरांदे, डॉ.अभिषेक पाटील, डॉ.जयश्री आव्हाड, डॉ.ओंकार हरिदास, डॉ.स्मिता झांजूर्णे, डॉ.सौरभ बिर्ला, डॉ.अक्षय राऊत, डॉ.अमित लडकत, डॉ.अश्विनी दळवी, डॉ.अर्चना चव्हाण, डॉ.भारती संत, डॉ.अनिकेत कुगावकर, डॉ.राजीव नायक, डॉ.विक्रांत प्रसाद, डॉ.अक्षय साखरे, डॉ.महेश पवार, डॉ.निखिल भोसले, डॉ.अश्विनी दरावडे, डॉ.केदार केळकर, डॉ.विदुलता जगताप, डॉ.अपूर्व साह, डॉ.नितीन सपाट, डॉ.श्वेता बोरावके, डॉ.विशाखा साबळे आणि डॉ.अपूर्वा लोढा यांचाही सामावेश करण्यात आला आहे. हडपसर मेडिकल असोसिएशन चे डॉ.चंद्रकांत हरपळे, डॉ.सचिन आबने आणि डॉ.शंतनु जगदाळे यांचाही सामावेश करण्यात आला आहे.

इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत डॉ.सौरभ वंडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ.वंडकर मेमोरिअल अवॉर्ड यावेळी डॉ. जागृती दहिलकर आणि डॉ.अपूर्वा लोढा यांना त्यांनी वर्षभर केलेल्या भरीव कामगिरी साठी देण्यात आला.

या वेळी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेच्या “DENTURN 2022” या वार्षिक अंकाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या वार्षिक अंकामध्ये दंतवैद्यकांनी विविध प्रकारचे लेख, कविता यांचे लिखाण केले आहे. इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेने गेले वर्षभर केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यामध्ये घेतला आहे. अंकासाठी योगदान दिलेल्या सर्व डॉक्टरांचे यावेळी आभार मानले.
या सभेला असोशिएशनचे सभासद,पदाधिकारी, सर्व माजी अध्यक्ष उपस्थित होते.

इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेची स्थापना २०१५ साली झाल्यापासून आजपर्यंत संस्थेने अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेतला असून समाजाचे मौखिक आरोग्य जपणे आणि त्याविषयी सामाजिक जाण वाढवण्याचे काम केले आहे. IDA हडपसर च्या दंतवैद्यांनी तब्बल ५००० शालेय मुलांची तपासणी एकच वेळी करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले आहे. कोविड काळात म्युकोरमायकॉसिस या दुर्धर आजारासंबधी गरजेच्या वेळी समाजोपयोगी चलचित्रफित तयार करून समाजात जनजागृती केली. महीला दिनादिवाशी तब्बल 100 पेक्षा जास्त दवाखान्यात महिलांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ४०० हून अधिक दंतवैद्यांचे राज्यस्तरीय दंतवैद्य संमेलनाचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. अशा एक ना अनेक समाजाभिमुख उपक्रमांसाठी आजपर्यंत IDA हडपसरला ४ राज्यस्तरीय तर १ देश पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.