बी.एल.मानकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमीत्त शिळीम (ता.मावळ) येथील आदिवासी कातकरी परिवाराला ब्लॅंकेटचे वाटप

244

पुणे प्रतिनिधी,

साध्य़ा कौलारू घरात राहणाऱ्या दिडशे परिवाराला थंडीपासून बचाव करण्यासाठी संस्थेकडून सामाजिक बांधिलकीतून मायेची ऊब मिळाली.
शिळीम गावाच्या बाहेर आदिवासी कातकरी परिवार वस्ती करून राहतो. दुसऱ्यांकड़े मोलमजूरी करून येथील दिडशे परिवार आपली उपजिविका भागवितो. आर्थिक विंवचनेमुळे ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत हा समाज गेली कित्येक पिढ्यांपासून बाराही महिने काबा़डकष्ट करतो. या परिवाराचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी बी.एल.मानकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
त्याच्या वितरणप्रसंगी शिळीमचे सरपंच रसिका घोगरे, उपसरपंच लिलाधर धनवे, शाळा समितीचे अध्यक्ष शत्रुघ्ऩ धनवे, शिवसेना विभागप्रमुख संतोष शिंदे, आजीवलीचे शिवसेना शाखाप्रमुख तानाजी लायगुडे, दिपक घोगरे, माजी सरपंच यशवंत शिंदे, पोलिस पाटील संदीप बिडकर, शिवविद्या प्रतिष्ठानचे संतोष वंजारी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब मानकर, डॉ.वर्षा मानकर, उपाध्यक्ष अभिजीत माझिरे, खजिनदारस्वप्निल जगताप त्याचप्रमाणे कातकरी महिला उपस्थित होत्या.
तथापि ब्लॅंकेट मिळाल्याने या परिवाराचा आता थंडीपासून बचाव होणार आहे. संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे शिळीम ग्रामस्थांनी कौतुक केले. डॉ. मानकर यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सरपंच रसिका घोगरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अभिजित माझिरे यांनी केले.