बावा’ लघुपटाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

271

पुणे, (ता.०३) : स्वरगंधार संगीत व साहित्य प्रसार संस्था पुणे, आयोजित संगीतकार सागर गायकवाड निर्मित बावा या कौटुंबिक विषयावर आधारित लघुपटाचा लोकार्पण आणि पोस्टर लॉन्चिंग सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अमोल देवळेकर, फॅन्ड्री चित्रपटाचे निर्माते निलेश नवलाखा, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मोहरक्याचे दिग्दर्शक अमर देवकर, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, सरहद पुणे चे विश्वस्त शैलेश वाडेकर, आयकर विभागाचे उपायुक्त स्वप्नील चौधरी, युवा उद्योजक निलेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चित्रपट व कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा संगीतकार सचिन अवघडे,निवेदिका व निर्माती शोभा कुलकर्णी,युवा अभिनेत्री धनश्री पाटील सीट बेल्ट शॉर्ट फिल्मच्या मुख्य अभिनेत्री अनुश्री लोंढे तसेच ‘वास इज दास’ या नाटकातील संपूर्ण कलाकार संघाच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.

कार्यक्रमाचे संयोजन स्वरगंधार संस्थेचे कार्याध्यक्ष सागर गायकवाड, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे, स्वरगंधार संस्थेचे संस्थापक गोपाळ कांबळे, व स्वरगंधार संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केले होते.