ब्रम्हमुहूर्तावर अलंकापुरीत गरजला ज्ञानबा तुकोबांचा नामाचा गजर ; अवघी अलंकापुरी माऊलींच्या नामाने दुमदुमली

463

अनिल चौधरी, पुणे

ब्रम्हमहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने महा मेडिटेशन सोहळा ब्रम्हमहूर्तावर तीर्थक्षेत्र अलंकापुरीच्या इंद्रायणीतीरी विश्वरूप दर्शन मंच घाटावर केंद्राच्या साधकांच्या उपस्थितीत ” ज्ञानोबा तुकाराम’ “ज्ञानोबा तुकाराम” या जयघोषात टाळ मृदंगाच्या निनादात अतिशय भक्तिमय पूर्ण वातावरणात अद्भुत पूर्ण भक्तीमय सोहळा इंद्रायणीकाठी एका ठेकात भक्तीच्या ताल सुरात योगगुरू दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनात रंगल्याने अवघी अलंकापुरीनगरी भक्ती रसात पहाटे नाहून निघाली. ‘ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पुज्यस्थानी, चिंताकांचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा…’ असे म्हणत ब्रम्हमहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या साधकांनी भगवा ध्वज उंचावत माऊलींचा नामघोष करत अवघी अलंकापुरी दुमदुमवली.

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने महामेडिटेशन सोहळ्याचे आयोजन श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी काठी केले होते. यासाठी केंद्राच्या वतीने विशेष तयारी देखील केली होती . एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांनी आठशे साधकांची चहा नाष्टयाची सोय केली होती. हातात भगव्या पताका कपाळी बुक्का, केसरी गंध, लावून अन मुखातून ‘ज्ञानोबा-तुकारामा’चा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात अलंकापुरी भल्या पहाटे अविरतपणे व परंपरेने चालत आलेला संप्रदायिक नामघोष ब्रम्हमुहुर्त  योग ज्ञानपीठ केंद्राच्या साधकांनी माऊलीचरणी समर्पित केला.

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर | मुखी म्हणता चुकतील फेरे || होतील संतांचिया भेटी | सांगू सुखाचिया गोष्टि || आळंदी अलंकापुरीत माऊलीच्या प्रेरणेने संतांची मांदियाळी ने सारी आळंदी अलंकापुरी माऊलीच्या जयघोषात दूम दुमत आहे, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, माऊलींची संजीवनी समाधी सुख सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी साधकांनी इंद्रायणी काठी मोठी गर्दी केली होती . तर मेडिटेशन योगगुरू दिपकजी महाराज यांच्या मार्गदर्शनात पार पडले. हा सोहळा पार पाडण्यासाठी भाजपा अध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष ह.भ.प. संजय घुंडरे पाटील, संतोष गोरड यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ह भ प नरहरी महाराज चौधरी, माजी नगरसेवक अशोक कांबळे ( उमरगेकर) ,क्षीरसागर महाराज, अजित वडगावकर, महादेव पाखरे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुराडे, दिनेश कुराडे, विठ्ठल शिंदे , केंद्राचे अध्यक्ष शशिकांत आंनदास , अश्विनी पासलकर , सुधीर गरुड , दुधे , रवींद्र औटी , जनसेवक राजेंद्र भिंताडे , शशिकांत पुणेकर, कालिदास लोणकर, विजय लोणकर, अनिल राऊत, दिवाकर गोरे, विनायक दरेकर, संतोष डोलारे, बाळासाहेब पाटील, संजय भोसले, सतीश शिंदे, प्रदीप पवार, दर्शन किराड, पत्रकार अनिल चौधरी , विजय मोरे , भानुदास होले, दादा रणदिवे, अनंत टेकाडे, नितीन थोपटे ,गुरूमाऊली वैशालीजी, मंगल मोरे , प्रतिभा मोरे, उर्मिला भालेराव , जयश्री पुणेकर, रेशमा थोपटे , प्रतिभा चौधरी, गौरी फुलावरे, रुपाली लोणकर, रेणुका भिंताडे, सुषमा होले, दीपाली भिंताडे, सर्व टीम मेंबर, कोचर टीम आणि सर्व हॉल इन्चार्ज आदी उपस्थित होते . तर हा महामेडिटेशन सोहळा अद्वितीय , अविस्मरनीय होता अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.