हनुमान जन्मोत्सव उत्सहात साजरा करा; तानाजी लोणकर

603

कोंढवा प्रतिनीधी

कोंढवा येथील संकट हरण महादेव मंदिरात असणाऱ्या हनुमान मंदिरात सकाळी अभिषेक ,होम हवन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला असून नागरिकांनी महाप्रसाद, दर्शनाचा तसेच संगीतमय सुंदरकांड लाभ घेऊन हनुमान जन्मोउत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करा , असे आवाहन संकट हरण महादेव मंदिराचे व्यवस्थापक ,माजी नगरसेवक तानाजी लोणकर व कोंढवा खुर्द ग्रामस्थ यांनी केले आहे.

हनुमान जन्मोत्सवच्या पार्श्भूमीवर आज संगीतमय सुंदरकांड अतिशय सुंदर आयोजन मंदिरात केले होते. गायक मिनू पोदार आणि संजय पारख यांच्या सुंदर आवाजाने गायिलेल्या भजन, हनुमान चालीसाने नागरिक मंत्रमुग्ध झाले.

तर मा नगरसेवक तानाजी लोणकर यांनी हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.