जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थानच्यामार्फत 39वे देहदान

321

मल्हार न्यूज प्रतिनीधी, पुणे 

जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान वतीने राज्यात चांगले डॉकटर घडावेत म्हणून देहदान चा उपक्रम सुरू केला आहे.त्याची अंमबजावणीही झाली संस्थांच्या वतीने साधकांना देहदानाचे आवाहन करण्यात आले आणि पहाता पहाता साधकांनी प्रतिसाद देत आत्तपर्यंतच 39 देहदान करण्यात आले.

मंगळवार दि. 2मे रोजी कै पार्वतीबाई बाबुराव शिवले वय ८२ रा गणेश पेठ , शिवाजीनगर पुणे यांचे दुःखद निधन झाले . कुटुंबाच्या वतीने मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करण्यात आला आणि त्यांचे नातू मंगेश नंदकुमार शिवले यांनी नवले हॉस्पिटल येथे त्यांच्या आजीचे मरणोत्तर देहदान केले.
नरेंद्र महाराज संस्थान ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्वरित आपल्या आजीचे देहदान केले.
देहदानाच्या प्रसंगी सूनबाई आशाताई शिवले आणि सुलोचनाताई शिवले ,नातु मंगेश शिवले आणि जितेंद्र शिवलेहे उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा श्यामराव शिवले. भाचा राकेश टेमगिरे सुकेश टेमगीरे हेही उपस्थित होते
जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान चे डॉ. बाळासाहेब मानकर ,पश्चिम महाराष्ट्र पिठाचे संजीवनी प्रमुख विजय बांदल, पुणे जिल्हाचे देणगी प्रमुख विलास लांडे, शिवाजीनगर तालुका अध्यक्ष संतोष कुकडे व संप्रदायचे हवेली तालुका अध्यक्ष सचिन काकडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.