पालखी साहळ्या निमित्त केंद्र सरकारचे ९ वर्षातील कार्य व प्रमूख योजनांवर अधारित फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे आयोजन.

164

प्रतिभा चौधरी,पुणे

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त केंद्र सरकाच्या, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुणे येथील केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालयच्या वतीने केंद्र सरकाचे ९ वर्षातील कार्य व प्रमूख योजनांची माहिती देण्यासाठी फिरत्या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मल्टिमिडीया वाहन प्रदर्शनाचे उद्घाटन, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनांक ११ जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता पुणे शहरातील विभागीय आयूक्त कार्यालय(विधानभवन) येथे होणार असून यावेळी सौरभ राव, विभागीय आयूक्त पुणे, राजेश देशमुख,जिल्हाधिकारी, पुणे, निखिल देशमुख उपसंचालक केंद्रीय संचार ब्यूरो पुणे व डॉ. जितेंद्र पानपाटील, व्यवस्थापक, केंद्रीय संचार ब्यूरो, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायी वारीसाठी संपूर्ण देशाभरातून येणारे वारकरी व भक्तांसाठी केंद्र सरकारच्या विविध विकासात्मक उपक्रमांची माहिती देण्याच्या मल्टिमिडिया प्रदर्शच्या माध्यमातून तसेच सांसकृतिक कलापथकांद्वारे मनोरंजन व अभंगाच्या माध्यमातून उद्बोधन व प्रबोधन करण्यात येणार आहे.
पंढरपूर पायी वारी सोहळा वारकरी सांप्रदायासाठी मोठा सणच आहे, हा सण म्हणजे हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्तीची एक पर्वणीच. अशा या पायी वारी पालखी सोहळ्यांच्या प्रस्तानांपासून ते पंढरपूर पर्यंत फिरत्या मल्टिमिडी वाहन प्रदर्शनातील एलइडी स्क्रीन(LED Screen)व माहितीचे पोष्टर्सच्या माध्यमातून केद्र सरकारचा ९ वर्षातील कार्यकाळात विकासात्मक व जनतेच्या हितासाठी राबविण्यात आलेल्या प्रमूख योजनांची माहिती देण्यात येणार आहे. पालखी मूक्कामाच्या ठिकानी कलापथकाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांवर उद्बोधन व प्रबोधनाबरोबरच थोर संतांचे भक्तीपर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
प्रत्येकी एक अशी दोन मल्टिमिडिया प्रदर्शन वाहने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सामिल होणार असून देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रांच्या पालखी प्रस्तानांपासून ते पंढरपूर पर्यंत या दोन फिरत्या मल्टिमिडिया वाहन प्रदर्शंनाद्वारे शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देणा-या प्रदर्शनास वारकरी आणि भाविकांनी भेटी द्याव्यात असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरोचे उपसंचालक निखिल देशमूख यांनी केले आहे.
**