वानवाडीत शिवराज्याभिषेक दिनी ३५० नागरिकांच्या हस्ते शिव-आरती

108

पुणे प्रतिनीधी,

” महाराजांच्या युद्धकला, राजीनीती – रणनीती, शेती धोरण, संघटन कुशलता व दूरदृष्टी मुळे शेकडो वर्षांच्या आक्रमणानंतर रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. ४५० वर्षांपूर्वी उद्ध्वस्त केलेले श्रीराम मंदिर छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षात उभे राहते आहे ही महाराजांना सर्वात मोठी आदरांजली आहे..” असे प्रतिपादन प्रा मोहन शेटे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समस्त वानवडी ग्रामस्थ, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान व प्रसाद उर्फ दिनेश होले मित्र परिवाराच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

शिवगर्जना व पोवाडा आणि छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली.
महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
चंद्रकोर आणि त्रिपुंड गंध सर्वाना लावून केशरी उपरणे देऊन स्वागत करण्यात आले. सर्व नागरिक उत्साहाने स्वतःचे आरतीचे साहित्य घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज कि जय, जय भवानी – जय शिवाजी, हर हर महादेव आदी घोषणांनी परिसर दुमदुमला. प्रा शेटे यांच्या ओघवत्या वाणीतून महाराजांच्या जीवनातील घटना ऐकताना नागरिकांचा टाळ्या आणि घोषणांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमानंतर शिवछत्रपती पुतळा व परिसरात स्वच्छता अभियान राबवले.