सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाप्रती केंद्र सरकार समर्पित – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर

259

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर मुंबई भेटीसाठी आले आहेत. मुंबई दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, आज, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष आणि नृत्यकला गुरू डॉ.संध्या पुरेचा आणि सुप्रसिद्ध मराठी हिंदी सिने आणि नाट्य अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षांमध्ये सरकारने केलेल्या अभूतपूर्व कार्यांची माहिती दिली. सेवा, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाप्रती केंद्र सरकार समर्पित असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना त्यांच्या निवासस्थानी भेटल्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी त्यांना केंद्र सरकारने केलेल्या कार्यांची नोंद असलेली पुस्तिका भेट म्हणून दिली. या प्रसंगी वंदना गुप्ते म्हणाल्या की माझ्यासाठी ही अत्यंत अनोखी आणि आनंददायी भेट होती. नाट्यक्षेत्रात काम करणाऱ्यांना ज्या अडचणींना सामोरे जावे लागते त्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी दिली. चित्रपट क्षेत्राप्रमाणेच नाट्य क्षेत्राला देखील उद्योगाचा दर्जा दिला जावा, जेणेकरुन या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती देखील त्यांच्या हक्कांची मागणी करू शकतील असे वंदना गुप्ते यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या गेल्या 9 वर्षांतील यशस्वी कामगिरीबाबत यावेळी चर्चा झाल्याचे त्या म्हणाल्या.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची भेट घेतली

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज डब्ल्यू 20च्या अध्यक्ष आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित नृत्यकला गुरु डॉ.संध्या पुरेचा यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान ठाकूर यांनी डॉ.पुरेचा यांना केंद्र सरकारने केलेल्या कार्यांची नोंद असलेली पुस्तिका भेट म्हणून दिली. या भेटीबाबत बोलताना डॉ.संध्या पुरेचा म्हणाल्या की केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांना ‘मन की बात’ वर आधारित पुस्तक भेट म्हणून दिले आणि डॉ. पुरेचा यांनी पाचवा वेद म्हणून प्रसिध्द असणारी नाट्यशास्त्र भाषांतरविषयक पुस्तके केंद्रीय मंत्री ठाकूर यांना भेटीदाखल दिली. डब्ल्यू-20 अध्यक्ष म्हणून डब्ल्यू-20 पत्रकाबाबत आम्ही चर्चा केली. संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष या नात्याने भारतीय कला आणि संस्कृती यांतील तरुणांच्या सहभागाबाबत देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती डॉ.पुरेचा यांनी दिली. त्या म्हणाल्या की समाज आणि समुदाय यांच्या हिताच्या संदर्भात विस्तृत चर्चा झाली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित नृत्यकला गुरु डॉ.संध्या पुरेचा यांची भेट घेतली