भारती तुपे यांचे सामाजिक ऋण फेडण्याचे कार्य कौतुकास्पद – मारुती आबा तुपे

141

पुणे (प्रतिनिधी)

ह्यूमन राईट्स दिल्ली व्हाईस प्री्सीडेन्ट पुणे भारती रमेश तुपे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान अनाथ आश्रम तुकाई टेकडी येथे वाढदिवसाच्या औचित्य साधून अनाथ मुलांसमवेत केक कापला तसेच मुलांना खाऊ वाटप व तांदळाची पोती आश्रमास भेट म्हणून दिली.
याप्रसंगी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, महाजनहित प्रतिष्ठानचे महासचिव हेमंत ढमढेरे, सतीश भिसे, हरिभाऊ काळे, पत्रकार अनिल मोरे, ह्यूमन राइट्स दिल्ली महाराष्ट्र अध्यक्षा अंजुला जैस्वाल, पुणे प्री्सीडेन्ट अॅडव्होकेट के. टी.आरु, पुणे प्री्सीडेन्ट ऍड. चिराग आस्वानी, व्हाईस प्री्सीडेन्ट मनीषा शेवाळे, श्रीदेवी गांधी, मेघना प्रामाणिक, ऍड. मयुरा पाटील, आनंद गलांडे, चंद्रशेखर गलांडे, अमोल गलांडे, योगेश शिंदे, प्रमोद साळुंखे, दशरथ येवले, लक्ष्मी भोसेकर, प्रीती जैन, सपना म्हस्के, ज्योती पारख, रेखा साळवे, सुचित्रा डावकर, सुकन्या आढाव, जयहिंद मित्रमंडळाचे अध्यक्ष विश्वजीत तुपे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारती रमेश तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त फुरसुंगी येथील अण्णा देवकर गोशाळेस तीन टन चारा देण्यात आला.
कोणताही अनाठाही खर्च न करता वाढदिवस अनाथ मुलांसमवेत व गो शाळेत चारा देऊन सामाजिक उपक्रमाद्वारे सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न भारती तुपे यांनी केला हे कार्य कौतुकास्पद असल्याचे माजी नगरसेवक मारुती आबा तुपे व ॲडव्होकेट के.टी आरु, यांनी सांगितले.
समाजाप्रती असलेली तळमळ व अनाथ मुलांच्या भावना समजून घेऊन मदतीचा हात देणाऱ्या भारती तुपे यांनी खऱ्या अर्थाने वाढदिवस सत्कारणी लावला अनाथांना मदत तर केलीच गो शाळेत चारा देऊन मुक्या जीवांचा घेतलेला आशीर्वाद भावी आयुष्यासाठी लाभदायक आहे, आगामी सामाजिक कार्यात महाजनहित प्रतिष्ठान सोबत असल्याचे महासचिव हेमंत ढमढेरे यांनी सांगितले.
सतीश भिसे यांनी सूत्रसंचालन केले भारती तुपे यांनी आभार मानले.