कात्रज कोंढवा रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघता विरोधात शिवसेनेचे आंदोलन

335

कोंढवा प्रतिनिधी

कात्रजा कोंढवा रस्त्यांवर होणाऱ्या वारंवार अपघातां विरोधात प्रशासनाचा निषेध करण्यासाठी माजी आमदार महादेव बाबर यांच्यानेतृत्वाखाली रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले.

एकाच आठवड्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याने कात्रज कोंढवा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे.आज पुन्हा एका नागरिकाचा अपघातीमृत्यू झाल्याने  स्थानिक ग्रामस्थ संतप्त होऊन शिवसेनेचे मा आम महदेब बाबर  यांच्या नेतृत्वात रास्ता रोखो आंदोलन करून पुणे मनपा प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी  आंदोलनाची दखल घेऊन मनपा आयुक्तानी येत्या दोन दिवसात आपण या ठिकाणी भेटदेऊन योग्य ती काळजी घेण्याचे आश्वासन देण्यात आले त्यामुळे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.

याप्रसंगी कोंढवा ब्रुद्रुक ग्रामस्थ मा महदेब बाबर,राकेश कामठे, गणेश कामठे, माजी नगरसेवक तानाजी लोणकर, सागर कामठे , युवा नेते प्रसाद बाबर गंगाधर बधे , संदीप बधे तसेच सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते उपस्थित होते.