G20 नेत्यांची ही भव्य शिखर परिषद इतिहास घडवेल: अनुराग ठाकूर

104

पुणे प्रतिनिधी,

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटरला भेट दिली आणि तेथील तयारीचा आणि व्यवस्थेचा आढावा घेतला. नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 9 -10 सप्टेंबर 2023 दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे. या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रमस्थळी एमसीआर , स्टुडिओ, पीसीआर , पिक्यूआर आणि सोशल मीडिया रूमची पाहणी केली.

यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या आयोजनासाठी भारत उत्सुक आहे. भारतातील 60 हून अधिक शहरांमध्ये 200 हून अधिक बैठका झाल्या आणि या बैठकांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला अशी माहिती त्यांनी दिली. एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून G20 नेत्यांची शिखर परिषद इतिहास घडवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय मीडिया सेंटरमधील व्यवस्थेबद्दल बोलताना ठाकूर म्हणाले की, येथे जागतिक दर्जाच्या सुविधा असून त्या नवभारताचे सामर्थ्य दर्शवतात. भारतातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या कलाकृतीनी इथल्या भिंती सुशोभित केल्या आहेत. शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेल्या भारत मंडपमच्या बाजूलाच मीडिया सेंटर आहे .

मुख्य मीडिया सेंटर जिथे पत्रकार परिषदा होणार आहेत त्याला हिमालय हे नाव देण्यात आले आहे आणि तिथे 300 हून अधिक पत्रकारांसाठी आसनव्यवस्था आहे. भारत त्याच्या डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी जगभरात ओळखला जातो आणि हे तंत्रज्ञानातील सामर्थ्य इथल्या पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले जाईल असे ते म्हणाले.

“या शिखर परिषदेदरम्यान भारत आपल्या समृद्ध संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडवेल आणि त्याच वेळी नव्या भारताची उदात्त प्रतिमा जगासमोर ठेवेल” असे ठाकूर म्हणाले.

G20 परिषदेच्या निमित्ताने जगभरातील माध्यमांमधील पत्रकार एकत्र आलेले पहायला मिळतील असे सांगून केंद्रीय मंत्र्यांनी जगभरातील पत्रकार बंधु-भगिनींचे हार्दिक स्वागत केले.

कार्यक्रमाच्या प्रसारणासाठी बारकाईने तपशील विचारात घेऊन चोख व्यवस्था उभारल्याबद्दल दूरदर्शनचे कौतुक करताना ते म्हणाले की विमानतळ ते भारत मंडपम दरम्यान विविध ठिकाणी 78 हून अधिक UHD आणि 4 हजार कॅमेरे बसवून दूरदर्शन अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. सर्व माध्यमांना क्लीन फीड पुरवले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमस्थळी माध्यमांच्या सुविधेसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे.

मुख्य शिखर परिषद भारत मंडपम येथे होणार आहे आणि नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार संवर्धन संघटना (आयटीपीओ) संकुलातील सभागृह क्रमांक 4 आणि 5 मध्ये आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम केंद्र (आयएमसी) विकसित केले जात आहे.
आगमन, निर्गमन, उद्घाटन आणि समारोप समारंभ, द्विपक्षीय बैठका, (एनजीएमए आणिआयसीएआर) एकत्रित कार्यक्रम, आणि राजघाटावरील कार्यक्रम इत्यादी अधिकृत कार्यक्रमांचे वृत्त चित्रीकरण केवळ डीडी आणि अधिकृत परदेशी माध्यमांद्वारे केले जाईल.सर्वांना क्लीन फीड दिले जाईल.
आयएमसीकडे सर्व प्रकारच्या सुविधांसह 2000 हून अधिक माध्यम प्रतिनिधींचे आतिथ्य करण्याची क्षमता आहे.
आयएमसी अधिकृत माध्यमांसह सर्व देशांतर्गत आणि परदेशी माध्यमांचे आतिथ्य करेल.
केवळ अधिस्वीकृतीप्राप्त (नोंदणी केलेल्या सर्वांच्या छाननीनंतर प्रदान केलेली ऑनलाइन मान्यता) माध्यमकर्मींना आयएमसीमध्ये प्रवेश दिला जाईल
सर्व माध्यमकर्मींसाठी आयएमसी येथे खालील सुविधा पुरविल्या जातील

इंटरनेट जोडणी आणि प्रिंटरसह 1300 हून अधिक कार्यस्थळे
अतिशय वेगवान वायफाय सेवा
आंतरराष्ट्रीय प्रसारण केंद्र (आयबीसी) : प्रसार भारतीने भारत मंडपममध्ये चित्रण केलेल्या क्लीन फीडसाठी
छोटे माध्यम बूथ, समोरासमोर मुलाखतीसाठी मुलाखत कक्ष
पत्रकार परिषदेसाठी खोली (दूतावास आणि अधिकृत माध्यमांसाठी 100/50 ची क्षमता): जिथे परदेशी प्रतिनिधी पत्रकार परिषद आयोजित करतील
प्रसारमाध्यमांना वृत्तांकनासाठी लाईव्ह स्टँड-अप पोझिशन्स उपलब्ध
मीडिया लाउंज
माहिती कक्ष
मदतकक्ष
वैद्यकीय कक्ष
खाद्यपदार्थांचे विविध पर्याय उपलब्ध असतील
जेएलएन आणि आयएमसी दरम्यान 1400 पार्किंग सुविधा आणि 80 हून अधिक शटल बसेस धावतील
शिवाय, माध्यमांच्या भेटीसाठी खालील प्रदर्शने खुली असतील

रिझर्व्ह बॅंकेचे डिजिटल नवोन्मेष दालन सभागृह 3 च्या स्वागत कक्षामध्ये
लोकशाहीची जननी (चित्रफीत ) प्रदर्शन सभागृह 5 च्या स्वागत कक्षामध्ये
सभागृह 4 च्या स्वागत कक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयद्वारे डिजिटल इंडिया भारावून टाकणारा अनुभव
सभागृह 3 च्या तळमजल्यावर एक ओडीओपी म्हजेच एक जिल्हा एक उत्पादन प्रदर्शन आणि उत्पादने ठेवण्यात येणार आहेत.
भारत 1 डिसेंबर 2022 पासून “वसुधैव कुटुंबकम” किंवा “एक पृथ्वी · एक कुटुंब · एक भविष्य” या संकल्पने अंतर्गत जी 20 अध्यक्षपद भूषवत आहे.

हा कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक आणि देशांतर्गत अशी दोन्ही माध्यमे सर्वात मोठ्या संमेलनाची साक्षीदार होणार आहेत.

* * *