वडगावशेरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सहात साजरी

93

प्रणिल चौधरी,पुणे

||कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम:||

सालाबाद प्रमाणे या वर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वडगावशेरी येथील श्रीकृष्ण वाडीतील श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण प्रतिष्ठानच्या वतीने श्रीकृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
*यावेळी प्रतिष्ठान च्या वतीने भव्य मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात श्रीकृष्णाला नविन सोन्याच्या दागिन्यांचा श्रृंगार चढवण्यात आला**
यामध्ये गळ्यातील हार, मुगुट, सोन्याचे मोरपीस,हातातील कडे असे विविध दागिने श्रीकृष्णाला मा.आमदार जगदिश मुळीक यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला मा.आमदार बाप्पु साहेब पठारे येरवडा पोलिस स्टेशनचे बाळकृष्ण कदम साहेब(PI) नगर सेवक योगेश मुळीक,नगरसेविका सुनिता गलांडे,उद्योजक विजय दत्ता, रंगनाथ गलांडे, राजेश देवकर,विजय गलांडे,नासीर खान,हे मान्यवर उपस्थित होते,
उत्सवाची सुरवात श्रीगणेशाच्या आरतीने करण्यात आली.
मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मंदीरातील पाळणा हालवून करण्यात आला.यावेळी रात्री भजन, किर्तन, आरती,गवळणीचा कार्यक्रम तसेच महिलांनी फुगडी वर ठेका धरला.६ः३० ते १२ः३० या वेळेत सदर कार्यक्रम करण्यात आला.यावेळी महिलांचा मोठा सहभाग होता. परिसरातील मान्यवर,नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक व भाजपा पश्चिम महाराष्ट्र उद्योग आघाडी चे सहसंयोजक महेंद्र गलांडे यांनी केले होते.