“ह्यूमन राईट्स महिलांच्या वतीने येरवडा बंदिवानांसोबत रक्षाबंधन उपक्रम साजरा…

131

“बंदिवानांना कुटुंबीयांसमवेत रक्षाबंधन केल्याची जाणीव – भारती तुपे

 

हडपसर (प्रतिनिधी )

ह्यूमन राईट्स दिल्ली च्या महाराष्ट्र व पुणे विभागाच्या वतीने येरवडा कारागृहातील बंदी झालेल्या बंदिवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी ह्यूमन राईट्स महाराष्ट्र अध्यक्षा अंजुला जैस्वाल, पुणे उपाध्यक्षा श्रीदेवी गांधी, भारती रमेश तुपे, मनीषा शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा कार्याध्यक्ष सविता मोरे आदी यावेळी उपस्थित होते.
कारागृह अधीक्षक अनिल खामकर, तुरुंग अधिकारी राजेंद्र मरळे, तुरुंग अधिकारी संतोष कोकणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
देशात रक्षाबंधनला पवित्र स्थान आहे, भाऊ बहिणीच्या पवित्र नात्यांचा सण म्हणून दरवर्षी मोठ्या जल्लोषात देशात हा सण साजरा केला जातो काही ना काही कारणाने कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अनेक जण येरवडा कारागृहात वर्षानुवर्ष शिक्षा भोगत आहेत त्यांना आपल्या कुटुंब परिवारासोबत राहता येत नाही त्यांच्या समवेत रक्षाबंधन साजरा करून त्यांनाही कुटुंब सोबत असल्याची जाणीव करून द्यावी यासाठी आम्ही रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे आयोजक ह्यूमन राइट्सच्या पुणे व्हाईस प्रेसिडेंट भारती रमेश तुपे यांनी सांगितले.
ह्युमन राईट च्या वतीने असे अनोखे उपक्रम राबवित समाजातील दुर्लक्षित घटकांना लाभ मिळवून देणार असल्याचे ह्यूमन राइट्स महाराष्ट्र अध्यक्षा अंजुला जयस्वाल यांनी सांगितले.
ह्यूमन राइट्स च्या या अनोख्या उपक्रमाबद्दल येरवडा कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले. बंदिवानांसाठी यावेळी अल्पप आहाराची ही व्यवस्था करण्यात आली होती.