जेष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

258

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे स्वागत

पुणे : भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी शुक्रवारी दुपारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, राजाभाऊ पायमोडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

मीनाक्षी शेषाद्री म्हणाल्या, दगडूशेठ हलवाई गणपती उत्सवात धार्मिक वातावरण आहे. माझ्या मनात अनेक इच्छा आहेत. गणराया सुखकर्ता- दुखहर्ता आहे. त्यामुळे गणरायाने सर्वांना सुखी समाधानी ठेवावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.