पुण्यातील स्ट्रीट फूड व्यवसायाला मिळतोय नावीन्याचा इंटरनॅशनल टच विश्वविक्रमी अमृत फूडकार्ट लोकांच्या सेवेत रुजू

192

प्रनिल चौधरी,पुणे:

रस्त्यावरील हातगाड्यांवरील खाद्यपदार्थ खाणे आजवर अस्वच्छता आणि आजारांना निमंत्रण देणारी बाब ठरत होती. आता मात्र, एशियन कंट्रीज् चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजेच `अकोही`च्या प्रदीर्घ संशोधनातून आविष्कृत करण्यात आलेल्या `अमृत`या अत्याधुनिक हातगाडीमुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. महाराष्ट्रात पुण्यात `अमृत फूड कार्ट`चा पहिला परवाना वाघोली भागातील मे. शिंदे चौपाटी यांना प्रदान करण्यात आला.

याबाबत बोलताना, `अकोही`चे अध्यक्ष डॉ. सानी अवसरमल यांनी सांगितले, की रस्त्यावरील खाद्यपदार्थांची समस्या लक्षात घेता `अमृत` या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा हातगाडीची कल्पना आम्हाला सूचली. त्यावर अनेक वर्षे संशोधन व प्रयोग केल्यानंतर हे मॉडेल विकसित करण्यात आले. भारतच नव्हे तर आशिया, तसेच जगभरातील रस्त्यावरील संस्कृतीला या अभिनव व क्रांतिकारी संकल्पनेतून प्रगतीचा नवा स्पर्श लाभणार आहे. स्ट्रीट फूडच्या बाबतीत न्यूयॉर्क हे जगातील सर्वोत्तम शहर मानले जाते. तरीही, आम्ही विकसित केलेले मॉडेल जगभरात कुठेही आढळणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. अमृत फूडकार्ड या अत्याधुनिक हातगाडीचे हे उत्पादन आविष्कृत करण्यासाठी आम्हाला संशोधन आणि विकास प्रक्रियेत ७ वर्षे लागली. खाद्यपदार्थांची गरज, स्थिती, प्राधान्य, स्वच्छता, सुरक्षितता, ग्राहकांची पसंती आणि भारत सरकारचे धोरण या सर्व बाबींना केंद्रस्थानी ठेऊन आम्ही आमच्या प्रिय देशासाठी ही संकल्पना अत्यंत काळजीपूर्वक विकसित केली आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. या नावीन्यपूर्ण उत्पादनामुळे स्ट्रीट फूडच्या क्षेत्रात आपला भारत संपूर्ण आशिया खंडात अग्रेसर ठरु शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. आपण भारतीय स्ट्रीट फूडसाठी ओळखलो जातो, मात्र आम्ही त्यास योग्य तो सन्मान देत नाही. आमच्या या प्रयोगातून आम्ही या क्षेत्राला तो सन्मान देऊ पाहतो आहोत. या फ्रॅंचायजी मॉडेलच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जाणाऱ्या विक्रेत्यांनाही यातून आर्थिक स्वातंत्र्य लाभणार आहे, असेही डॉ. अवसरमल यांनी नमूद केले.

 

अमृत फूड कार्टची प्रमुख वैशिष्ट्ये

विशेष खाद्य हातगाडी म्हणून ३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम

सर्वोत्तम दर्जाच्या व प्रमाणित स्टेनलेस स्टीलपासून निर्मिती
वापरण्यास व हाताळण्यास अगदी सोपी. एक व्यक्ती देखील ही हातगाडी सहज ढकलू शकतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारची चाकांचा वापर करण्यात आला आहे.
सौरउर्जेचा वापर
हात धुण्यासाठी स्वतंत्र जागा
सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसणारे महागडे पाणी येथे स्वयंपाकासाठी व पिण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहे. भारतातच नव्हे तर अवघ्या जगतात अशा प्रकारची प्रथमच सुविधा देण्यात आलेली आहे. खाद्यपदार्थ तयार करताना त्यात अल्कलाइन पाण्याचा होणारा वापर हे अमृत फूडकार्टचे अद्वितिय वैशिष्ट्य असून जगभरात अशा प्रकारची सुविधा आजतागायत कुठेही नाही.
पाण्याच्या स्वतंत्र टाक्या (अल्कलाइन व नियमित)
गाडीवर स्क्रोल डिस्प्ले, वाय-फाय, जीपीएस, हॅंड सॅनिटायझर, सीसीटीव्ही, अग्निशामक उपकरणे आदींची उपलब्धता आहे. दर्शनी भागातील स्क्रोल डिस्प्लेवर गाडीचे नाव, मालकाचे नाव, स्पेशालिटी, एफडीए परवाना क्रमांक आदी माहिती दिसू शकते.
ग्राहकांना सेवा देण्यासाठी तिन्ही बाजू उपलब्ध व तिथे स्पेशल ब्रॅंडिंगचे पर्याय
सुका व ओला कचरा ठेवण्यासाठी गाडीच्या वरती आणि खालती स्वतंत्र जागा
सर्वसाधारण हातगाड्यांवर वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक असते. त्यामुळे ग्राहकाच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती असते. इथे, `अकोही`ने प्रमाणित केलेल्या विशेष व निवडक दूध, लोणी, तूप आदींचाच वापर केला जातो.
अन्न सुरक्षितता निषकांनुसार, अकोही ने प्रमाणित केलेल्या व सर्वोत्तम गुणवत्तेच्या प्लेट वा तत्सम सामग्रीची खाद्यपदार्थ वाढण्यासाठी वापर
अन्न तयार करण्यासाठी सर्वोत्तम दर्जाच्या घाण्याच्या तेलाचा वापर. तसेच, नैसर्गिक मीठ व गंधकहिन साखर यांचा वापर.
गाडीवर बसविण्यात आलेल्या `सीसीटीव्ही`चे थेट फुटेज स्थानिक प्रशासनाला दिसू शकते, जेणेकरुन त्यांना ग्राहकांची सुरक्षा तसेच परिसरातील परिस्थितीवर लक्ष ठेवता येऊ शकते. याचप्रमाणे, गाडीमालकालाही सीसीटीव्ही मुळे घरी बसून आपल्या व्यवसायाकडे लक्ष ठेवता येऊ शकते.
येथे बसविण्यात आलेल्या मशिन्स व सॉफ्टवेअरमुळे कॅशलेस व्यवहार करता येणे शक्य
अमृत फूडकार्टच्या काटेकोर नियमावलीनुसार कामगारांची व जागेची निवड करताना पोलिस क्लिअरन्स घेतले जाते
केंद्र सरकारच्या स्टॅंडअप् इंडिया, स्टार्टअप् इंडिया, डिजिटल इंडिया, सोलर इंडिया आणि मेक इन् इंडिया अशा योजनांचे निकष अंतर्भूत. यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतानाच, स्ट्रीट फूडच्या बाबतीत देशवासीयांच्या आरोग्याचीही काळजी घेण्याचे सूत्र पाळले जाते.
मालक व कर्मचाऱ्यांना तसेच गाडीला कोणत्याही अप्रिय घटनेपासून संरक्षण देण्यासाठी कवच या विशेष हॉस्पिटॅलिटी इन्शुरन्सचा आधार

फ्रॅंचायजी मालकाविषयी- `अमृत फूडकार्ट`फ्रॅंचायजीचे मालक असणारे राहुल शिंदे व प्रतिमा शिंदे हे दाम्पत्य मूळात तंत्रज्ञ असून त्यांनी एमबीए केलेले आहे. त्यांची `शिंदे चौपाटी` हा आपला व्यवसायाचा ब्रॅंड तयार केलेला आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणे करता यावा, यासाठी त्यांनी व्यवसाय सुरु करतानाच बरेच संशोधन केले होते. अमृत फूडकार्ड या संकल्पनेला साकारण्यासाठी फ्रॅंजायची म्हणून शिंदे चौपाटीची निवड करण्यात आली. त्याविषयी बोलताना राहुल शिंदे म्हणाले, की हा आमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय दिवस आहे. आपल्या व्यवसायाची या उपक्रमासाठी निवड झाली, याबद्दल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. अमृत फूडकार्डसाठी निवड होण्यापूर्वी आम्हाला त्यांच्या नियमावलीनुसार पात्रता निकष पूर्ण करण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या. पात्र झाल्यानंतर आम्हाला अमृत फूडकार्ड चालविण्यासाठीचा परवाना मिळाला. हा आमच्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव असणार आहे. कारण, आता आम्हाला खास कलिनरी आयडी मिळाल्याने आम्ही भारतीय हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे आता अविभाज्य भाग बनलेलो आहोत, याचा खूप आनंद आहे. परवाना मिळण्यासाठीची प्रक्रिया सोपी नव्हती. व्यवसायासाठीचे अनेक निकष, जसे की जागा, वातावरण, पार्श्वभूमी, शिक्षण, केवायसी, कायदेशीर बाबी आदींचा अमृत फूडकार्टच्या व्यवस्थापनाकडून बारकाईने अभ्यास केला गेला. त्यानंतरच परवाना देण्याचा निर्णय झाला. आम्ही आमच्या गाडीवर दाक्षिणात्य खाद्यपदार्थ व नाश्ता देणार असून अमृत फूडकार्टच्या मदतीने आम्ही या क्षेत्रात नवी झेप घेणार आहोत, असेही राहुल शिंदे यांनी नमूद केले.

 

खऱ्या अर्थाने हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पडलेले पाऊल आहे. आम्ही ५० ते ७० लाख रु. दुसऱ्या फ्रॅंचाईजमध्ये गुंतवणार होतो. परंतु, अमृत फूडकार्डची गाडी केवळ २.६० लाख रुपये व व्यवसायाचा एकूण प्रकल्पखर्च पाच लाखांच्या घरात आहे, हे आम्हाला समजल्यानंतर आमचा आत्मविश्वास दुणावला. आम्ही या प्रकल्पासाठी मोदी सरकारच्या मुद्रा योजनेचाही लाभ घेऊ शकलो. `अकोही` आणि अमृत फूटकार्टची संकल्पना आम्ही जेव्हा आमच्या बॅंकेला सांगितली, तेव्हा त्यांनी त्वरित प्रतिसाद देत आमचा कर्जप्राप्तीचा मार्ग आणखी सुलभ करुन दिला. त्याबद्दल आम्ही मोदी सरकार तसेच आमची बॅंक, बॅंक ऑफ इंडिया वाघोली शाखा व बॅंकेचे संपूर्ण व्यवस्थापन यांचे अतिशय आभारी आहोत, अशा शब्दांत शिंदे चौपाटीच्या मालक प्रतिमा शिंदे यांनी आपली भावना व्यक्त केली.

अमृत फूडकार्ड विषयीची संपूर्ण माहिती www.acohi.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. `अकोही`च्या अमृत फूडकार्डच्या व्यवस्थापनाशी inquiries.asia-division@acohi.org या ईमेल वर किंवा 9823270555 या व्हॉटस्अप क्रमांकावर संपर्क साधता येईल.

———