पायाचे लीगामेंट तुटून सुद्धा, परिस्थितीवर मात करत कुस्तीत 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक

173

*सांगवीचा पैलवान ते आंतरराष्ट्रीय खेळाडू…*

प्रनील कुमार, पुणे –

 

युनाइटर्ड वर्ल्ड रेसलिंग ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी यांच्या मान्यतेने व मल्लयुद्ध ट्रॅडिशनल कुस्ती असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या, नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 या कुस्ती स्पर्धेत सुमित भोसले यांनी 74 किलो वजनी गटात सुवर्णपदकं जिंकले, त्यांचा भारतात प्रथम क्रमांक आला.
रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 या कुस्ती स्पर्धेत भारताकडून निवड करण्यात आली.पायातील लीगामेंट तुटून सुद्धा, परिस्थितीवर मात भारतात प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी बोलताना सुमित भोसले म्हणाले, याचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना माझ्या मोठ्या भावाला, परिवाराला व माझ्या सांगवी गावाला देतो.
सदर स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू ताराचंद भाऊ कलापुरे वस्ताद यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.