अनुष्का पवारची प्रजासत्ताक दिनाच्या संचालयनासाठी निवड

639

कोंढवा प्रतिनिधी 

अनुष्का प्रवीण पवार हिला राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) ची विद्यार्थिनी नुकतेच एनसीसी ने गोल्डन सिनियर अंडर ऑफिसर ने नामंकित केले असून तिला या वर्षीच्या २६ जानेवारीच्या दिल्लीतील प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनासाठी निवड केली आहे. . या निवडीसाठी तिला वेगवेगळ्या शिबीरामध्ये सहभाग घ्यावा लागला होता. शिबीरामध्ये शिस्त. कवायत क्षमता, संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी कसोट्यांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागले. विशेष म्हणजे तिचे सादरीकरण हे तिच्या निवडीचे निकष ठरले. तिची भारतीय सेनेत जाण्याची मनीषा आहे. देशसेवेसाठी निवड झाल्याने कुटुंबात तसेच मित्रपरिवारामध्ये आनंद झाला असून अभिनंदनासाठी फोन खणखणत आहेत . अनुष्का ही मानसी व प्रविण पवार यांची कन्या आहे.
अनुष्का हि मुनींचे सेंट मीरा कॉलेज ची वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षा मध्ये शिकत आहे. लहानपणापासून देश सेवा करण्याची आवड असून तिने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये भाग घेतला आहे. तिला देश सेवेची आवड असून ती पुढील उच्च शिक्षण घेऊन लष्करात अथवा सामान्य प्रशासनात मोठे अधिकारी होऊन नागरिकांची सेवा करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.