हिक व्हिजन या आघाडीच्या कंपनीकडून कोंढव्यातील श्री गणेश कॉम्प्युटर्स चा सन्मान

190

अनिल चौधरी , पुणे

सी सी टी व्ही ची अधिकृत कंपनी हिक व्हिजन या आघाडीच्या कंपनीकडून ग्राहकांना उत्कृष्ट व योग्य दारात तसेच ग्राहकांना विक्री प्रश्चात तत्पर सेवा दिल्याबद्दल कोंढव्यातील श्री गणेश कॉम्प्युटर्स चा सन्मान करण्यात आला. यावेळी “हिक व्हिजन कंपनीपासून श्री गणेश चे संचालक कालिदास लोणकर व स्वप्नील मेमाणे यांना प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना कालिदास लोणकर म्हणाले कि, आम्ही ग्राहकांना आपले दैवत समजत असून त्यांची नेमकी गरज ओळखून तसेच अगदी अल्प किमतीत सी सी टी व्ही बसवून देत आहोत . वेळेवर डिलिव्हरी , बिनचूक पणे काम, ग्राहकांशी विनम्रपणे संवाद तसेच विक्री प्रश्चात तत्पर सेवा अशी आमची वैशिष्टये असल्याने आमच्या श्री गणेश कॉम्प्युटर्स चे नाव महाराष्ट्रात अल्पावधीत प्रसिद्ध झाले आहे. आम्ही आतापर्यंत विविध कॉर्पोरेट कंपन्या, खाजगी ऑफिसेस, बंगले, घरे , सोसयट्या तसेच नागरिकांच्या गरजेवर खरे उतरलो आहोत. ग्राहकांना अधिका अधिक चागली सेवा देण्याचे उद्दिष्टये असून तसेच अल्प किमतीत सी सी टी व्ही उपलब्ध करून तळागळातील नागरिकां पर्यंत उतरायचे स्वप्न आहे.