बाळूकाका उर्फ चिंतामणी गोखले यांचे निधन

63

नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठाचे सेवक

अर्जुन मेदनकर आळंदी

येथील श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठ श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील स्वामींचे निःसीम भक्त सेवक मठाचे व्यवस्थापक बाळूकाका उर्फ चिंतामणी यशवंत गोखले ( वय ८६ ) यांचे निधन झाले. ते वयाचे बाराव्या वर्षी आळंदीत आले होते. त्यांनी आजीवन ब्रम्हचारी राहून श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज मठात तत्कालीन सत्पुरुष बाळकू बुवा आणि त्या नंतर गादीवर आलेले श्री गोडबोले महाराज यांची त्यांनी अखंड सेवा केली. त्यानंतर त्यांनी मठाचे व्यवस्थापक म्हंणून अनेक वर्ष यशस्वी पणे कामकाज पाहिले. यात श्री नरसिव्ह वेदपाठशाळा, कॅन्सर रुग्णानासाठी स्वामींचे प्रेरणेतून इंद्रायणी हॉस्पिटल उभारणीत विशेष योगदान राहिले आहे. तिरटक्षेत्र आळंदीतील सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन वार्षिक उत्सव साजरे करीत सर्वाना आपलेसे करून घेणारे व्यक्तिमत्व, शांत, मनमिळावू स्वभाव, प्रेमळ पणे सर्वांची विचार पूस करीत सर्वाना खाडी साखरेचा प्रसाद आवर्जून देणारे बाळूकाका अशी त्यांची वेगळी ओळख होती. त्यांचे निधनाने अलंकापुरीवर शोककळा पसरली रात्री उशिरा त्यांचे पार्थिवावर आळंदीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्य संस्कार करण्यात आले.